Spying on China-Nepal talks China accuses India

'चोराच्या उलट्या बोंबा' अशी एक म्हण प्रख्यात आहे. चिनी ड्रॅगन नेपाळमध्ये याच म्हणीची प्रचिती देण्याच्या प्रयत्नात आहे. आतापर्यंत नेपाळ सरकारला आपल्या इशाऱ्यावर नाचविणारा चीन नेपाळमध्ये बदलत्या परिस्थितीने एवढा घाबरला आहे की, भारतावर हेरगिरी करण्याचा आरोप लावत आहे.

काठमांडू : ‘चोराच्या उलट्या बोंबा’ अशी एक म्हण प्रख्यात आहे. चिनी ड्रॅगन नेपाळमध्ये याच म्हणीची प्रचिती देण्याच्या प्रयत्नात आहे. आतापर्यंत नेपाळ सरकारला आपल्या इशाऱ्यावर नाचविणारा चीन नेपाळमध्ये बदलत्या परिस्थितीने एवढा घाबरला आहे की, भारतावर हेरगिरी करण्याचा आरोप लावत आहे.

एवढेच नव्हे तर चिनी मंत्र्याने उघडपणे नेपाळच्या राजकारणात हस्तक्षेप केला असतानाही उलट भारतानेच नेपाळच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप केला असल्याचा आरोप चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने केला आहे.

कोरोनाविषयी चर्चेसाठी शिष्टमंडळ

इतकेच नव्हे तर सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षामध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये जबरदस्तीने हस्तक्षेप करण्यासाठी चीनचे एक शिष्टमंडळ नेपाळ येथे पोहोचले आहे, यावर विश्वास ठेवण्यासही चीनचे परराष्ट्र मंत्रालय तयार नाही. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे की, कोरोनाविषयी चर्चा करण्यासाठी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे उपमंत्री गुओ येझू यांच्या नेतृत्वात अधिकाऱ्यांची एक टीम काठमांडू येथे आली.

नेपाळी नेत्यांनी योग्यप्रकारे वाद हाताळावा

परराष्ट्र मंत्रालयाने नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या परस्परविरोधी पक्षांना त्यांचे वाद योग्यरित्या हाताळण्यासाठी व राजकीय स्थिरतेसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन गटांमधील राजकीय सलोखा करण्याच्या उद्देशाने गुओच्या या भेटीचे उद्दिष्ट असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले की, चीनने नेपाळच्या राजकीय परिस्थितीतील घडामोडींची दखल घेतली आहे. मित्र आणि निकटवर्ती शेजारी म्हणून आम्ही आशा करतो की नेपाळमध्ये सर्व पक्षांचे राष्ट्रीय हित आणि संपूर्ण परिस्थिती विचारात घ्यावी आणि अंतर्गत वाद योग्य पद्धतीने सोडविला जाईल आणि राजकीय स्थिरता व राष्ट्रीय विकास साधला जावा, असे झाओ म्हणाले.

चीन-नेपाळ चर्चेची हेरगिरी

दरम्यान, फुदान विद्यापीठाचे प्राध्यापक लिन मिनवांग यांचा हवाला देत ग्लोबल टाईम्सच्या म्हटले की, चीनने बेल्ट्स अँड रोड अंतर्गत नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्याचे हेच कारण आहे की चीनला नेपाळमधील परिस्थितीबद्दल चिंता करण्याची योग्य कारणे आहेत. हे नेपाळच्या अंतर्गत कामकाजात हस्तक्षेप नव्हे तर दोन पक्षांमधील सहकार्य आहे. आणखी एक चिनी तज्ज्ञ हू झिओंग म्हणाले की, ही दोन पक्षांमधील देवाणघेवाण आहे आणि त्याचा भारताशी काही अर्थ नाही. हू झिओंग म्हणाले की, नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांवर नजर ठेवण्यासाठी भारताने आपल्या गुप्तचर यंत्रणा पाठवल्या आहेत, असे मला नेपाळी अभ्यासकांनी सांगितले आहे. चिनी मंत्री आणि नेपाळी नेते यांच्यात भारत हेरगिरी करीत आहे. त्याच वेळी लिन म्हणाले, खरे हे आहे की, भूतकाळ असो किंवा वर्तमान काळ, भारत नेपाळच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करणारी सर्वांत शक्तिशाली परदेशी शक्ती आहे.