कोरोना महामारी नाही तर या कारणामुळे श्रीलंकेत कर्मचाऱ्यांना करण्यात आलेय ‘वर्क फ्रॉम होम’ची सक्ती

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेला आता इंधनाच्या भीषण संकटाचा सामना करावा लागत आहे. ते इंधन पुरवठ्यासाठी भारताकडून 500 दशलक्ष डॉलर्स प्राप्त करण्यासाठी नवीन तारखेच्या मंजुरीची वाट पाहत आहेत. ही रक्कम मिळाल्यास श्रीलंकेसाठी पुढील चार महिन्यांच्या इंधनाची व्यवस्था करण्यात येईल, असे ऊर्जामंत्री कांचन विजेसेकरा यांनी सांगितले(Sri Lankan workers forced to work from home).

    कोलंबो : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेला आता इंधनाच्या भीषण संकटाचा सामना करावा लागत आहे. ते इंधन पुरवठ्यासाठी भारताकडून 500 दशलक्ष डॉलर्स प्राप्त करण्यासाठी नवीन तारखेच्या मंजुरीची वाट पाहत आहेत. ही रक्कम मिळाल्यास श्रीलंकेसाठी पुढील चार महिन्यांच्या इंधनाची व्यवस्था करण्यात येईल, असे ऊर्जामंत्री कांचन विजेसेकरा यांनी सांगितले(Sri Lankan workers forced to work from home).

    तीन-चार आठवड्यांपूर्वी भारताशी नवीन क्रेडिट लाइनबद्दल अनौपचारिकपणे बोललो आहोत, परंतु अद्याप नवीन तारखेची अधिकृत पुष्टी झालेली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती या वर्षी खूप वाढल्या आहेत. कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडत आहेत. सरकार कच्च्या तेलाची व्यवस्था अन्य मार्गाने करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु ते खूप महागात पडत आहे.

    देशात दररोज 5400 मेट्रिक टन डिझेलची मागणी असताना केवळ 3000 मेट्रिक टन डिझेलची पूर्तता होत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचवेळी 3400 मेट्रिक टन पेट्रोलच्या मागणीच्या तुलनेत केवळ 2600 मेट्रिक टन पेट्रोलची पूर्तता होत आहे.

    इंधनाअभावी देशभरातील वाहतूक व्यवस्था जवळपास ठप्प झाली आहे. श्रीलंकेने पुढील दोन आठवडे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घरून काम करण्याची घोषणा केली आहे. मंत्रालयाचे सचिव, राज्य विभाग आणि संस्थांच्या प्रमुखांना कर्मचाऱ्यांची किमान संख्या निश्चित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यांना सार्वजनिक सेवा अखंड सुरू राहतील याची खात्री करण्यास सांगितले आहे.