चीनमध्ये कारखान्याला लागलेल्या आगीत 36 जणांचा मृत्यू

या दुर्घटनेत 36 जणांचा मृत्यू झाला असून दोघांना किरकोळ दुखापत झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    चीन : चीनमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. मध्य चीनमधील हेनान प्रांतात (Henan) एका कारखान्याला आगी लागल्याची घटना घडली आहे. या आगीत (Fire In China) सुमारे 36 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. चीनच्या प्रसारमाध्यमांनी आज याबाबत माहिती दिली.

    चीनच्या एनयांग शहरातील (Anyang City fire) एका कारखान्यात ही घटना घडली. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास ही आग लागली. आग लागताच परिसरात एकच खळबळ माजली. स्थानिक आणि
    अग्निशमन दलाच्या मदतीने कित्येत तासानंतर आगीवर नियत्रंण मिळविण्यत यश आलं. 200 हून अधिक कर्मचारी आणि सुमारे 60 अग्निशमन दल यांच्या साहय्यने आग विझवण्यात आली.

    या बचावकार्यासाठी अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी  तब्बल  63 गाड्या पाठवल्या होत्या. दुपारच्या सुमारास लागलेली ही आग रात्री 8 वाजेपर्यंक धगधगत होती. त्यांनतर  रात्री 11 वाजेपर्यंत पूर्णपणे विझवण्यात आली. या दुर्घटनेत 36 जणांचा मृत्यू झाला असून दोघांना किरकोळ दुखापत झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.