
किम जोंग उन यांनी उत्तर कोरियाच्या एका शहरावर कडक लॉकडाऊन लागू केले कारण सैनिकांच्या 653 गोळ्या गेल्या. गोळ्यांचा संपूर्ण शहरात शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गोळ्या सापडेपर्यंत लॉकडाऊन सुरू राहणार आहे.
प्योंगयांग: उत्तर कोरिया (North Korea) असा देश आहे की त्याच नाव जरी घेतलं की तिथल्या नियमांच्या नावानेच धडकी भरते. या देशातली नियम, कायदे अजब गजबच आहेत. आणि त्याहूनही अजब गजब म्हणजे या देशाच सर्वोच्च नेता किम जोंग उन. (Kim Jong un) किम जोंग नेहमीच विचित्र नियम लागु करण्यासाठी ओळखला जातो. आता त्याने देशातील हायसान या 2 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात कडक लॉकडाऊन (Strict lockdown)लागू केला. आता कोरोनामुळे लॅाकडाऊन लावलं असेल असं सगळ्यांना वाटनं साहाजिक आहे. मात्र, या लॅाकडाऊनच कारण ऐकाल तर कपाळ्यावर हात मारल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. काय ते कारण जाणुन घेऊया.
उत्तर कोरियाच्या हायसानमध्ये लॉकडाउन
रेडिओ फ्री एशियाच्या माहितीनुसार, 7 मार्च रोजी, सैनिकांनी असॉल्ट रायफलच्या 653 राउंड गोळीबार केला, ज्यामुळे शहर लॉकडाउन करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैन्याकडुन काही गोळ्या गायब झाल्यानंतर किम जोंग उन यांनी अधिकाऱ्यांना संपूर्ण शहरात शोधण्यास सांगितले. या सर्व 653 गोळ्या सापडेपर्यंत शहरात लॉकडाऊन करण्याची अजब घोषणा करण्यात आली. रिपोर्टनुसार, जेव्हा सैनिकांना लक्षात गोळ्या हरवल्याची बाब लक्षात आली तेव्हा ते कळवण्याऐवजी त्यांनी स्वतः गोळ्या शोधण्याचा प्रयत्न केला.
अधिकाऱ्यांचा लोकांवर दबाव
शोधूनही जवानांना गोळ्या सापडणार नसल्याचे लक्षात येताच त्यांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली, त्यानंतर शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं. गेल्या आठवड्यात, प्रांतातील कारखाने, शेततळे, सामाजिक गट आणि देखरेख युनिट्सना गोळ्यांशी संबंधित तपासात सक्रिय सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, अधिकारी भीती पसरवत त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी खोटे बोलत असल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे.