उंदरांची संख्या वाढल्याने ऑस्ट्रेलियात घबराट, उंदरांचं ब्रिटन आणि चीन कनेक्शन

ऑस्ट्रेलियात सध्या घरोघरी, शेतात, दुकानात बघेल तिकडं उंदरांचा सुळसुळाट झालाय. वाहनांमध्येही उंदीर जाऊन गाड्या खराब करत आहेत. घरात साठवून ठेवलेल्या धान्याची आणि शेतातीत पिकांचीदेखील उंदीर नासाडी करत आहेत. अनेक दुकानदार सध्या उंदरांचा बंदोबस्त करण्यात व्यग्र आहेत. कपड्यांपासून इतर साहित्यापर्यंत अनेक विक्रेत्यांचा माल गोडावूनमध्ये उंदीर कुरतडून टाकत असल्यामुळे सर्वांनाच अक्षरशः घाम फुटलाय. 

    ऑस्ट्रेलियामध्ये सध्या एक वेगळंच संकट उभं राहिलंय. गेल्या काही आठवड्यांपासून ऑस्ट्रेलियात अचानक उंदरांची संख्या वाढू लागली आहे. जागोजागी उंदीर दिसू लागल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत.

    ऑस्ट्रेलियात सध्या घरोघरी, शेतात, दुकानात बघेल तिकडं उंदरांचा सुळसुळाट झालाय. वाहनांमध्येही उंदीर जाऊन गाड्या खराब करत आहेत. घरात साठवून ठेवलेल्या धान्याची आणि शेतातीत पिकांचीदेखील उंदीर नासाडी करत आहेत. अनेक दुकानदार सध्या उंदरांचा बंदोबस्त करण्यात व्यग्र आहेत. कपड्यांपासून इतर साहित्यापर्यंत अनेक विक्रेत्यांचा माल गोडावूनमध्ये उंदीर कुरतडून टाकत असल्यामुळे सर्वांनाच अक्षरशः घाम फुटलाय.

    या उंदरांच्या वाढत्या संख्येमुळे प्लेग पसरण्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात येतेय. केवळ घर आणि अडगळीच्या जागेपुरता या उंदरांचा वावर आता मर्यादित राहिलेला नाही. तर दुकानं, धान्याची गोदामं, वाहनं अशा चौफेर वावर वाढला आहे. एवढंच नव्हे, तर मोठमोठ्या हॉस्पिटलमधील आयसीयु वॉर्डपर्यंतदेखील उंदीर पोहोचल्याचं सांगितलं जातंय. ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावरही सध्या याचीच चर्चा सुरु असून उंदीर पकडतानाचे व्हिडिओ नागरिक शेअर करत आहेत.

    उंदरांचा इतिहास

    ऑस्ट्रेलियात वास्तविक उंदीर नव्हते. मात्र १७८७ सालानंतर अचानक उंदरांची संख्या वाढली. याच काळात ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन यांच्यात व्यापार सुरू झाल आणि ब्रिटनहून येणाऱ्या जहाजातून हे उंदीर मोठ्या संख्येनं ऑस्ट्रेलियात आल्याचं सांगण्यात येतं. तर जगातील सर्व देशांत उदरांचा प्रादुर्भाव हा चीनकडून झाल्याचं सांगितलं जातं. २ हजार वर्षांपूर्वी पसरू लागलेल्या प्लेगचं मूळ हे चीनमधील उंदीर हेच असल्याचं सांगितलं जातं. त्याचप्रमाणं चीनची व्यापारी जहाजं ज्या ज्या देशांत जातात, त्या सर्व देशांत उंदरांचा त्रास असल्याचं सांगितलं जातं.