भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाऊ मानणाऱ्या बलोच यांचा संशयास्पद मृत्यू, कॅनडामध्ये आढळला मृतदेह

करीमा बलोच यांचा घातपात झाल्याचा आरोप कॅनडामधील पत्रकारांनी केलाय. करीमा या कॅनडामध्ये वास्तव्याला होत्या. गेल्या तीन दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या. २०१६ साली जगातील प्रभावशाली १०० महिलांच्या यादीत त्यांचं नाव झळकलं होतं. त्यानंतर त्या कॅनडामध्ये शरणार्थी म्हणून राहत होत्या. पाकिस्तानकडून होत असलेल्या अन्यायाला सातत्यानं वाचा फोडण्याचं काम त्या करत होत्या.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाऊ मानणाऱ्या पाकिस्तानमधील सामाजिक कार्यकर्त्या करीमा बलोच यांचा मृत्यू झालाय. कॅनडामध्ये संशयास्पद अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.  बलोच या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाऊ मानत होत्या.

करीमा बलोच यांचा घातपात झाल्याचा आरोप कॅनडामधील पत्रकारांनी केलाय. करीमा या कॅनडामध्ये वास्तव्याला होत्या. गेल्या तीन दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या. २०१६ साली जगातील प्रभावशाली १०० महिलांच्या यादीत त्यांचं नाव झळकलं होतं. त्यानंतर त्या कॅनडामध्ये शरणार्थी म्हणून राहत होत्या. पाकिस्तानकडून होत असलेल्या अन्यायाला सातत्यानं वाचा फोडण्याचं काम त्या करत होत्या.

याअगोदर पत्रकार साजिद हुसैन हेदेखील मे महिन्यात संशयास्पदरित्या मृतावस्थेत सापडले होते. करीमा बलोच या भारतीय गुप्तहेर संघटनेच्या प्रतिनिधी असल्याचा गैरसमज पाकिस्तानचा होता. पाकिस्तानकडून बलुचिस्तान प्रांतातील नागरिकांची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप सातत्यानं केला जातोय. गेल्या १५ वर्षांपासून बलुचिस्तानमध्ये विद्रोही वातावरण भडकलंय. पाकिस्तानी सैन्याकडून क्रौर्याचा वापर करून नागरिकांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा वेळोवेळी बलोच यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उपस्थित केला होता.

बलोच यांनी एका मुलाखतीदरम्यान, नरेंद्र मोदी यांना आपण भाऊ मानत असल्याचं सांगितलं होतं. बलुचिस्तानातील सर्व महिलांच्या नजरा मोदींकडे लागून राहिल्या आहेत, असे उद्गारही त्यांनी काढले होते. त्यांनी ट्विटवरवरून मोदींना राखीदेखील धाडली होती.