coronavirus vaccine severe allergic reaction in us health worker minutes after pfizer shot

भारतातून येणाऱ्या नागरिकांसाठीच्या नियमांमध्ये बदल(Rules Changed For Indians Coming To Switzerland) करण्यात आले आहेत. लसीचे दोन्ही डोस घेतले असतील किंवा कोरोनातून बरे झाले असतील अशा नागरिकांना आता कोणत्याही चाचणीशिवाय आणि विलगीकरणाशिवाय स्वित्झर्लंडमध्ये प्रवेश(Indians Can Get Entry In Switzerland) देण्यात येणार आहे.

    स्वित्झर्लंडमध्ये(Switzerland) कोरोनामुळे(Corona) लागू करण्यात आलेले निर्बंध २६ जूनपासून शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे भारतातून येणाऱ्या नागरिकांसाठीच्या नियमांमध्ये बदल(Rules Changed For Indians Coming To Switzerland) करण्यात आले आहेत. लसीचे दोन्ही डोस घेतले असतील किंवा कोरोनातून बरे झाले असतील अशा नागरिकांना आता कोणत्याही चाचणीशिवाय आणि विलगीकरणाशिवाय स्वित्झर्लंडमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

    जे कोरोनातून बरे झालेले नाहीत किंवा ज्यांचं लसीकरण झालेलं नाही, त्यांना मात्र निगेटिव्ह RTPCR रिपोर्ट सादर करणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर त्यांना देशात प्रवेश केल्यानंतर विलगीकरणात राहणंही बंधनकारक आहे, अशी माहिती स्वित्झर्लंड सरकारने दिली आहे.

    जिथे कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार झालेला आहे अशा इतर देशांसाठीही असेच नियम लागू असतील असंही सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर स्वित्झर्लंड सरकारने असंही सांगितलं आहे की, देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कोविड प्रमाणपत्र जर कोणाला हवं असेल तर तेही देण्यात येईल. हे प्रमाणपत्र स्वित्झर्लंडमध्ये ग्राह्य धरलं जाईल. मॉल, हॉटेलमध्ये जर प्रवेश नाकारण्यात आला तर हे प्रमाणपत्र दाखवल्यानंतर सदर व्यक्तीला प्रवेश दिला जाईल. संपूर्ण लसीकरण किंवा करोना झाल्याचा कालावधी यांच्या आधारावर हे प्रमाणपत्र देण्यात येईल.

    या देशात मास्कची सक्तीही लवकरच रद्द करण्यात येणार आहे. त्याचबरोबर हॉटेलमध्ये जाऊन जेवण्यावरचे निर्बंधही हटवण्यात येतील. या महिन्याच्या अखेरपर्यंत देशातल्या अर्ध्याहून अधिक प्रौढांचं लसीकरण पूर्ण होणार आहे.