Tables, chairs that grow on this tree; If you order now, you will get delivery of furniture after five years

अशा नैसर्गिक वाढलेल्या खुर्च्या मिळवायच्या असतील तर त्यासाठी किमान 7 ते 9 वर्षे वाट पहावी लागते. या प्रकारे आकर्षक फर्निचर बनविण्याची कल्पना सर्वप्रथम फर्निचर डिझायनर गोविन मुन्रो यांना सुचली आणि त्याने फुलग्रोन कंपनी स्थापन करून या आगळ्या फर्निचरविक्रीची सुरवात केली. मुन्रो सांगतात तुम्हाला अश्या खुर्च्या टेबले हवी असतील तर आत्ता ऑर्डर नोंदविली तर 2025 ला डिलिव्हरी मिळू शकेल. कारण हि विलो झाडे सुरवातीला नैसर्गिक पद्धतीने 5 वर्षे वाढविली जातात आणि नंतर त्याच्या फांद्या कापल्या जातात.

    निसर्गात शेकडो प्रकारच्या वनस्पती आहेत त्यात विचित्र प्रकारच्या झाडांचाही समावेश आहे. इंग्लंडच्या डर्बीशायर केलस भागात अशी झाडे आहेत ज्याच्या फांद्यावर जणू फर्निचर उगवते. या झाडांना विलो असे नाव असून त्याच्या वेतासारख्या पातळ पण अतिशय चिवट आणि लवचिक अश्या फांद्या हव्या त्या आकारात वळवून वाढविता येतात. त्यामुळे त्यातून खुर्च्या, टेबले कोणतेही सुतारकाम न करता बनविता येतात.

    अर्थात अशा नैसर्गिक वाढलेल्या खुर्च्या मिळवायच्या असतील तर त्यासाठी किमान 7 ते 9 वर्षे वाट पहावी लागते. या प्रकारे आकर्षक फर्निचर बनविण्याची कल्पना सर्वप्रथम फर्निचर डिझायनर गोविन मुन्रो यांना सुचली आणि त्याने फुलग्रोन कंपनी स्थापन करून या आगळ्या फर्निचरविक्रीची सुरवात केली. मुन्रो सांगतात तुम्हाला अश्या खुर्च्या टेबले हवी असतील तर आत्ता ऑर्डर नोंदविली तर 2025 ला डिलिव्हरी मिळू शकेल. कारण हि विलो झाडे सुरवातीला नैसर्गिक पद्धतीने 5 वर्षे वाढविली जातात आणि नंतर त्याच्या फांद्या कापल्या जातात.

    नवीन आलेल्या लवचीक फांद्या धातूच्या फ्रेमला गुंडाळून वाढू दिल्या जातात आणि त्यातून खुर्च्या, टेबले, लँप शेड अश्या वस्तू तयार होतात. अश्या प्रकारच्या विविध 100 वस्तू तयार करता येतात. अर्थात हे नैसर्गिक फर्निचर तसे बरेच महाग असून एका टेबल खुर्ची साठी साडेचार लाख रुपये मोजावे लागतात.

    हे सुद्धा वाचा