तैवानच्या क्षेपणास्त्र विकास अधिकाऱ्याचा मृत्यू, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ५७ वर्षीय ओ यांग यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांना हृदयाशी संबंधित आजार असल्याचेही त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. सीएनएने सांगितले की, ओ यांग व्यवसायानिमित्त पिंगटुंग शहरात गेले होते. ते अनेक क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्पांवर देखरेख करत होते. वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.

     

    नवी दिल्ली – चीन-तैवान तणावादरम्यान तैवान संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन आणि विकास युनिटच्या अधिकाऱ्याचा मृतदेह सापडला आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाच्या नॅशनल चुंग-शान इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे उपप्रमुख ओ यांग ली-हिंग हे शनिवारी सकाळी पिंगतुंग शहरातील एका हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळले, अशी माहिती सेंट्रल न्यूज एजन्सी (सीएनए) ने दिली.

    अधिकाऱ्यांनी सांगितले की, ५७ वर्षीय ओ यांग यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांना हृदयाशी संबंधित आजार असल्याचेही त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. सीएनएने सांगितले की, ओ यांग व्यवसायानिमित्त पिंगटुंग शहरात गेले होते. ते अनेक क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्पांवर देखरेख करत होते. वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यांचा मृत्यू अशा वेळी झाला आहे जेव्हा चीन तैवानजवळ सतत लष्करी कवायती करत आहे.

    अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे संतप्त झालेल्या चीनने ३ ऑगस्टपासून लष्करी कवायती सुरू केल्या आहेत. चिनी लष्कराची विमाने तैवानच्या हवाई हद्दीत सातत्याने घुसखोरी करत आहेत. तैवानच्या आजूबाजूच्या ६ भागात हा लष्करी सराव सुरू आहे. पहिल्या दिवशी, चीनच्या १०० हून अधिक लढाऊ विमानांनी तैवानच्या उत्तर, नैऋत्य आणि आग्नेय हवाई क्षेत्रात उड्डाण केले.