तालिबानने अफगाण प्राध्यापकाला घेतले ताब्यात, महिला शिक्षणाच्या समर्थनार्थ फाडल्या होत्या पदव्या, वाचा काय होतं प्रकरण ?

तालिबानने सांगितले की, शिक्षक मशाल काही काळापासून व्यवस्थेच्या विरोधात काम करत होता, त्यामुळे सुरक्षा एजन्सीने त्याला चौकशीसाठी नेले आहे. तर त्याचा सहकारी फाजील सांगतो की, तो काबूल विद्यापीठात गेल्या 10 वर्षांपासून शिकवत आहे. त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही, तरीही त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

    नवी दिल्ली – अफगाणिस्तानमधील काबुल विद्यापीठातील एका प्राध्यापकाने डिसेंबर 2022 मध्ये थेट टीव्ही कार्यक्रमादरम्यान पदव्या फाडल्या होत्या. जिथे माझ्या आई आणि बहिणीला शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य नाही, असे शिक्षण मी स्वीकारत नाही, असे ते म्हणाले होते. आता तालिबानने त्या प्राध्यापक इस्माईल मशालला ताब्यात घेतले आहे. त्याचा एक साथीदार फरीद अहमद फाजीलने शुक्रवारी सांगितले की, मशालला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याला क्रूरपणे नेण्यात आले. तालिबानच्या एका अधिकाऱ्यानेही याला दुजोरा दिला आहे.

    व्यवस्थेविरुद्ध काम केल्याचा आरोप
    तालिबानने सांगितले की, शिक्षक मशाल काही काळापासून व्यवस्थेच्या विरोधात काम करत होता, त्यामुळे सुरक्षा एजन्सीने त्याला चौकशीसाठी नेले आहे. तर त्याचा सहकारी फाजील सांगतो की, तो काबूल विद्यापीठात गेल्या 10 वर्षांपासून शिकवत आहे. त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही, तरीही त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. फाजील म्हणाला की, मशाल मुली आणि इतर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोफत पुस्तके देत असे. त्यांना अटक करून कोठे ठेवण्यात आले आहे, याची आम्हाला माहिती नाही.

    ‘शरिया जबाबदारी’
    तालिबानने अंमलात आणलेल्या प्रत्येक फर्मानाचे वर्णन ‘शरिया जबाबदारी’ असे केले आहे. शरिया कायद्यातील प्रत्येक शब्दाला धार्मिक महत्त्व आहे. येथे या कायद्यांतर्गत केलेले गुन्हे हे थेट अल्लाहची अवज्ञा मानली जातात. शरिया कायदा जीवन पद्धतीचे वर्णन करतो. या कायद्यांनुसार सर्व मुस्लिमांनी आपले जीवन जगणे अपेक्षित आहे.