Taliban Laws

इंडोनेशियात एका विवाहित महिलेने परपुरषाशी अनैतिक संबंध ठेवल्याने तिला तालिबानी शिक्षा सहन करावी लागली. हा गुन्हेगार पुरुषही विवाहितच होता. गुन्हा कबूल केल्यानंतर, महिलेला खुलेआम १०० चाबकाचे फटकारे मारण्यात आले. तर गुन्हेगार पुरुषाला केवळ १५ फटके खावे लागले. या महिलेला १०० चाबकाचे फटके खायचे होते, मात्र ती हा मार सहन करु शकली नाही, त्यामुळे काही काळाने हा प्रकार थांबवण्यात आला. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत(Taliban Punishment in Indonesia! 100 lashes for a married woman having an affair with a stranger; The woman could not bear the beating).

  जकार्ता : इंडोनेशियात एका विवाहित महिलेने परपुरषाशी अनैतिक संबंध ठेवल्याने तिला तालिबानी शिक्षा सहन करावी लागली. हा गुन्हेगार पुरुषही विवाहितच होता. गुन्हा कबूल केल्यानंतर, महिलेला खुलेआम १०० चाबकाचे फटकारे मारण्यात आले. तर गुन्हेगार पुरुषाला केवळ १५ फटके खावे लागले. या महिलेला १०० चाबकाचे फटके खायचे होते, मात्र ती हा मार सहन करु शकली नाही, त्यामुळे काही काळाने हा प्रकार थांबवण्यात आला. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत(Taliban Punishment in Indonesia! 100 lashes for a married woman having an affair with a stranger; The woman could not bear the beating).

  काय होते प्रकरण

  इंडोनेशियातील एच राज्यातील ही घटना आहे. या ठिकाणी कट्टरपंथ्यांचे वर्चस्व आहे आणि त्यांचीच तिथे सत्ता चालते. पोलीस तपास अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंध ठेवल्याच्या कारणावरुन एका विवाहित महिलेला आणि पुरुषाला कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाच्या चौकशीत महिलेने गुन्हा कबूल केला होता. तर पुरुषाने हे आरोप फेटाळले होते.

  कोर्टाने महिलेला खुलाम १०० फटके मारण्याचे आदेश दिले होते, तर पुरुषाला १५ फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. हा पुरुष या परिसरातील नामांकित व्यक्तींपैकी आहे.

  शरिया कायद्यानुसार शिक्षा

  इंडोनेशिया हा मुस्लीम देश आहे. एच प्रांतात विशेष करुन अशा कठोर शिक्षा सुनावल्या जातात. खटल्यावेळी पुरुषाने सर्व आरोप फेटाळले होते. त्यामुळे त्याला दोषी ठरवणे न्यायाधीशांसाठी अवघड होते. ऐच प्रांतात जुगार खेळणे, दारु पिणे, समलैंगिकता यासाठी कठोर शिक्षा देण्यात येते. या ठिकाणी शरिया कायदा लागू करण्यात आला आहे.

  या पुरुषालाही या प्रकरणात दोषी मानण्यात आले. २०१८ मध्ये या पुरुष आणि महिलेला आपत्तीजनक परिस्थितीत स्थआनिकांनी पकडले होते. तेव्हापासून या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. सुरुवातीला पुरुषाला ३० फटके मारण्याची शिक्षा होती, सुप्रीम कोर्टाने ती शिक्षा १५ वर आणली होती.

  गुरुवारीच दुसऱ्या एका प्रकरणात एका दुसऱ्या पुरुषाला अनैतिक संबंधांसाठी १०० फटके मारण्यात आले. त्याला ७५ महिने तुरुंगवासही भोगावा लागणार आहे. या दोन्ही शिक्षा होत असताना, अनेक जण ही शिक्षा पाहण्यासाठी उपस्थित होते. अनेकांनी याचे फोटो, व्हिडीओ काढले आणि नंतर ते व्हायरल करण्यात आले.

  हे सुद्धा वाचा
  • 2022