हिंसा, फतवे या पलिकडे जात तालिबानने केलं असं काही ‘ज्याची’ जगभरात चर्चा! बघा आता काय केलं यांनी

अफगाणिस्तानच्या ENTOP कार डिझाईन स्टुडिओ आणि अफगाणिस्तान टेक्निकल व्होकेशनल इन्स्टिट्यूट (ATVI) यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे.

    ‘तालिबान’ (taliban) हा शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोप काही येत असेव तर हिंसाचार (violence) आणि फतवे काढणारे तालिबानी नेते. (Talibani) टोयोटा गाड्यांवर मोठमोठ्या मशीनगन हातात धरून बंदुका आणि रायफल घेत दहशत माजवणारे लोक लक्षात येतात. जास्तीत जास्त महिला विरोधी कायदे करण्यात रस असलेल्या या देशात काही चांगल होईल याची अपेक्षा फार कुणाला नसताना या देशाने आता काहीतरी नवीन काम करुन दाखवलं आहे. ज्याची सोशल मिडियावर चांगली चर्चा सुरू आहे.  काय केलयं नेमकं या तालिबान्यांनी बघा.

    गेल्या काही दिवसांपासून एका सुपर कारचा (Supar Car) व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ‘टारझन: द वंडर कार’ चित्रपटातील अत्याधुनिक कारप्रमाणेच ही कार आहे. ही कार तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानमध्ये बनवण्यात आली होती. तालिबान सरकारने या स्वदेशी बनावटीच्या ‘सुपरकार’चे नुकतेच अनावरण केले आहे. MADA-9 असे या कारचे नाव आहे.

    किती आहे किंमत?

    टोलो न्यूजनुसार, MADA-9 सुपरकार तालिबान सरकारने बगराम एअरबेसवर सादर केली आहे. हे अफगाणिस्तानच्या ENTOP कार डिझाईन स्टुडिओ आणि अफगाणिस्तान टेक्निकल व्होकेशनल इन्स्टिट्यूट (ATVI) यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. हे 30 अफगाण अभियंत्यांनी बनवले आहे. ज्याचे नेतृत्व काबुलमध्ये राहणारा अभियंता रझा मोहम्मदी करत आहे. आत्तापर्यंत, या कारचे वैशिष्ट्य, वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञानाबद्दल कोणतीही माहिती सामायिक केलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर या कारमध्ये टोयोटाचे इंजिन वापरण्यात आले आहे.

    बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, एटीव्हीआयचे प्रमुख मौलवी गुलाम हैदर शाहमत यांनी या कारबाबत मीडियाला सांगितले की, तथापि, सुपर कार डिझाईन केल्याने तालिबानची विचारसरणी 360 अंश वळली आहे असा निष्कर्ष निघतो का? अजिबात नाही. आजच एक बातमी आली आहे की तालिबानने अनेक प्रकरणांमध्ये आरोपी नऊ लोकांना जाहीरपणे फटके मारले आहेत. खुनाच्या आरोपीला रस्त्यावर उभे करून गोळ्या झाडण्यात आल्या. याच कारणामुळे जेव्हा तालिबान नेत्यांनी त्यांच्या सुपरकारचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला तेव्हा अनेकांनी विचारले- ‘अहो मला सांगा की त्यात रॉकेट लाँचर कुठे ठेवणार?’