तालिबानचा मुलींच्या नावे नवा फतवा! आता खासगी विद्यापिठांध्ये शिकण्यास निर्बंध, प्रवेश परीक्षेला बसण्यास बंदी

आंतरराष्ट्रीय निषेध महिलांना शिक्षण आणि कामापासून वंचित ठेवण्याच्या निर्णयामुळे तालिबानचा आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध करण्यात आला आहे.

    तालीबानने अफगाणिस्तानची सत्ता हातात घेतल्यापासून नवे नवे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र या निर्णयांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला विरोधी निर्णय आहेत. आता तालीबानने पुन्हा असाच काहीसा निर्णय येथील महिलांवप लादला आहे. अफगाणिस्तानमधील  (Afganistan) खासगी विद्यापीठांमध्ये (Private University) शिकणाऱ्या मुली पुढील महिन्यात विद्यापीठाची प्रवेश परीक्षा देऊ शकणार नाहीत. याच कारण म्हणजे तालिबानने महिला विद्यार्थिनींना पुढील महिन्यात होणाऱ्या खासगी विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत बसण्यास बंदी घातली आहे. तालिबानच्या उच्च शिक्षण मंत्रालयाने यासंदर्भात विद्यापीठांना नोटीस पाठवली आहे.

    अफगाण वृत्तसंस्था टोलोन्यूजनच्या माहीतीनुसार, मंत्रालयाने काबूलसह अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील प्रांतांतील संस्थांना पत्रे पाठवली आहेत जेथे फेब्रुवारीच्या अखेरीस परीक्षा होणार आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे.  महिलांना शिक्षण आणि कामापासून वंचित ठेवण्याच्या निर्णयामुळे तालिबानचा आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध करण्यात आला आहे.

    एनजीओमध्ये काम करण्यास बंदी

    उच्च शिक्षण मंत्रालयाने डिसेंबरमध्ये विद्यापीठांना पुढील सूचना मिळेपर्यंत विद्यार्थिनींना प्रवेश न देण्यास सांगितले होते. काही दिवसांनी पुर्वी प्रशासनाने महिलांना स्वयंसेवी संस्थांना सोबत काम करण्यासही मज्जाव केला होता.

    तालिबानचा आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध

    आंतरराष्ट्रीय निषेध महिलांना शिक्षण आणि कामापासून वंचित ठेवण्याच्या निर्णयामुळे तालिबानचा आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध करण्यात आला आहे. पाश्चात्य मुत्सद्दींनी सूचित केले आहे की तालिबानला औपचारिक आंतरराष्ट्रीय मान्यता मिळण्यासाठी आणि त्यांचे आर्थिक अलगाव कमी करण्याची संधी मिळण्यासाठी महिलांबद्दलची त्यांची धोरणे बदलली पाहिजेत. तथापि, या आठवड्यात जागतिक बँकेच्या अहवालानुसार, तालिबान प्रशासन आता आर्थिक स्वावलंबनावर पूर्वीपेक्षा अधिक भर देत आहे. तालिबान प्रशासनाने गेल्या वर्षी महसूल संकलन वाढवले ​​आणि त्याची निर्यातही वाढली. तालिबानने महिला आणि मुलींच्या हालचालींच्या स्वातंत्र्यावर निर्बंध घातले आहेत. महिलांना कामगार दलातील बहुतेक भागातून वगळण्यात आले आणि महिलांना पार्क, जिम आणि सार्वजनिक स्नानगृहे वापरण्यास बंदी घातली.

    खासगी विद्यापीठांसाठी वेगळी परिक्षा

    अफगाणिस्तानमधील खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सरकारद्वारे एका वेगळ्या परीक्षा घेण्यात येते. याच आयोजन उच्च शिक्षण मंत्रालय करते. दरवर्षी मंत्रालय प्रवेश परीक्षेची तारीखही ठरवते. गेल्या वर्षी 20 डिसेंबर रोजी तालिबानच्या उच्च शिक्षण मंत्रालयाने सार्वजनिक आणि खासगी विद्यापीठांमध्ये मुलींना शिक्षण घेण्यास मज्जाव केला होता. त्या बंदीनंतर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, जपान, नेदरलँड, नॉर्वे, स्पेन, स्वित्झर्लंड आणि ईयू देशांनी तालिबानला तसे न करण्याचा इशारा दिला.