पाकिस्तानच्या बजेटमध्ये कंडोमवरही कर! इम्रान खान सरकारावर बिलावल भुट्टो चिडले म्हणाले…

पाकिस्तानच्या संसदेत सादर करण्यात आलेल्या मिनी बजेटवर, विरोधी पक्ष पीपीपीचे नेते बिलावल भुट्टो यांनी जोरदार टीका केली आहे. इम्रान खान सरकार हे देशात करांची त्सुनामी आणत असल्याचा प्रहार त्यांनी केला आहे. प्ले बॉय अशी प्रतिमा असलेल्या इम्रान खान यांच्या वैयक्तिक टीका करताना, इम्रान सरकारने कंडोमवरही कर लावल्याबद्दल टीकास्त्र सोडले आहे. एका खेळाडू कडून ही अपेक्षा न्वहती असेही ते म्हणालेत. खेळाडू या शब्दावर कोटी करत त्यांनीं इम्रान खान यांच्यावर जोरदार हल्ला केल्याचे मानण्यात येत आहे(Tax on condoms in Pakistan's budget too! Bilawal Bhutto got angry with Imran Khan's government ).

    इस्लामाबाद : पाकिस्तानच्या संसदेत सादर करण्यात आलेल्या मिनी बजेटवर, विरोधी पक्ष पीपीपीचे नेते बिलावल भुट्टो यांनी जोरदार टीका केली आहे. इम्रान खान सरकार हे देशात करांची त्सुनामी आणत असल्याचा प्रहार त्यांनी केला आहे. प्ले बॉय अशी प्रतिमा असलेल्या इम्रान खान यांच्या वैयक्तिक टीका करताना, इम्रान सरकारने कंडोमवरही कर लावल्याबद्दल टीकास्त्र सोडले आहे. एका खेळाडू कडून ही अपेक्षा न्वहती असेही ते म्हणालेत. खेळाडू या शब्दावर कोटी करत त्यांनीं इम्रान खान यांच्यावर जोरदार हल्ला केल्याचे मानण्यात येत आहे(Tax on condoms in Pakistan’s budget too! Bilawal Bhutto got angry with Imran Khan’s government ).

    बिलावल म्हणाले की, ‘गर्भ निरोधक (कंडोम)वरही आता कर लावण्यात आला आहे. आता इम्रान यांच्यासारख्या खेळाडूंकडून ही अपेक्षा नव्हती की ते कंडोमवरही टॅक्स लावतील. एककीडे पाकिस्तान, बांग्लादेश आणि भारतात लोकसंख्या वाढते आहे, सरकार या मुलांच्या खाण्यापिण्याच्या, शिक्षणाच्या, रोजगाराच्या गरजा भागवू शकत नाही, हे वास्तव आहे.

    एकीकडे संपूर्ण जगात गर्भ निरोधक याचा वापर वाढावा, यासाठी प्रयत्न होत असताना, पाकिस्तानात मात्र यावर टॅक्स लावण्यात येतो आहे. हे दुर्देवी आहे.  पाकिस्तानात एचआयव्ही आणि एड्सचे संकट आहे, त्याची जाणच सध्या देशाला आणि माध्यमांना नसल्याचेही ते म्हणालेत. पाकिस्तानातील एका शहरात याबाबतची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

    हे सुद्धा वाचा
    • 2022