Man speaks 7000 words in a day; 86 crore words are uttered in a lifetime

शिव्या देणे हा वाईट संस्कार मानला जातो. मात्र आता नवीन संशोधनात हा समज चुकीचा आहे हे सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे त्यामागचे विज्ञान सुद्धा आश्चर्यचकित करणारे आहे. घरी असो किंवा बाहेर कुठेही, हे लोक तुम्हाला प्रत्येक ठिकाणी शिव्या देताना दिसतील. शिव्या देणारी लोकं तशी तर कोणालाच आवडत नाही. मात्र जे नवे संशोधन समोर आले आहे त्यानुसार जे लोक वारंवार शिव्या देतात, त्यांचं आयुष्य अधिक असते, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

    मेंदूवरील ताण कमी होतो

    न्यूजर्सी येथील कीन विद्यापीठातील संशोधकांनी या संदर्भात केलेल्या अध्ययनात असे दिसून आले की शिव्या देऊन बोलणारे लोक समाधानी आणि आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य जगतात. यामागचे कारण म्हणजे शिव्या दिल्याने त्यांचे वैफल्य कमी होते, परिणामी स्ट्रेस कमी होतो आणि मेंदूवरील ताण कमी झाल्याने त्यांचे आयुष्य वाढते.

    विद्यार्थ्यांवर संशोधन

    या संशोधनासाठी काही विद्यार्थ्यांचा एका प्रयोगात समाविष्ट करण्यात आला. या विद्यार्थ्यांची बोटे बर्फाच्या पाण्यात काही वेळ बुडवून ठेवली गेली. जे विद्यार्थी शिव्या देणारे होते ते अधिक काळ बोटे बर्फात ठेऊ शकले पण जे शिव्या देणारे नव्हते त्यांना ते शक्य झाले नाही. यातून असा निष्कर्ष काढला गेला की शिव्या देणारे स्ट्रेसफ्री होतात, परिणामी त्यांचे आयुष्य वाढते उलट ज्यांना स्ट्रेस आहे त्यांचे मानसिक आरोग्य बिघडते आणि आणीबाणीच्या परिस्थितीत ते लवकर पराभव मान्य करतात.