Terrible effects of extreme heat in Antarctica! Mumbai-sized iceberg collapses, fear of rising sea level

पृथ्वीच्या ध्रुवांवर सुरु झालेल्या भीषण उन्हाळ्याचा परिणाम विनाशकारी होण्याची शक्यता आहे. अंटार्टिका खँडात सुरु झालेल्या उन्हाळ्यामुळे, मुंबई शहराच्या आकाराचा बर्फाचा डोंगर कोसळला आहे. या बर्फाच्या डोंगराचे नाव कोंगर आईस सेल्फ असे आहे. त्याचा परीघ सुमारे १२०० किलोमीटर इतका मोठा आहे. १५ मार्च रोजी बर्फाचा हा मोठा तुकडा अंटार्टिका खंडापासून वेगळा झाल्याचे सांगण्यात येते आहे. या सगळ्या काळात येथील तापमान उणे १२ डिग्री अँश सेल्सिअस इतके होते, जे तिथल्या सामान्य तापमानापेक्षा ४० डिग्री सेल्सिअस इतके जास्त होते(Terrible effects of extreme heat in Antarctica! Mumbai-sized iceberg collapses, fear of rising sea level).

  वॉशिंग्टन : पृथ्वीच्या ध्रुवांवर सुरु झालेल्या भीषण उन्हाळ्याचा परिणाम विनाशकारी होण्याची शक्यता आहे. अंटार्टिका खँडात सुरु झालेल्या उन्हाळ्यामुळे, मुंबई शहराच्या आकाराचा बर्फाचा डोंगर कोसळला आहे. या बर्फाच्या डोंगराचे नाव कोंगर आईस सेल्फ असे आहे. त्याचा परीघ सुमारे १२०० किलोमीटर इतका मोठा आहे. १५ मार्च रोजी बर्फाचा हा मोठा तुकडा अंटार्टिका खंडापासून वेगळा झाल्याचे सांगण्यात येते आहे. या सगळ्या काळात येथील तापमान उणे १२ डिग्री अँश सेल्सिअस इतके होते, जे तिथल्या सामान्य तापमानापेक्षा ४० डिग्री सेल्सिअस इतके जास्त होते(Terrible effects of extreme heat in Antarctica! Mumbai-Sized Iceberg Collapses, fear of rising sea level).

  जेव्हापासून सेटालाईट डेटा परिक्षण सुरु करण्यात आले, तोव्हापासून आत्तापर्यंत एवढ्या मोठ्या आकाराच्या बर्फाचा डोंगर तु
  टलेला पाहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया समुद्र अभ्यासक रॉर्ब लार्टर यांनी दिली आहे. कोंगरा हा तुलनेत कमी आकाराचा बर्फाचा तुकडा होता, गेल्या वर्षांत त्याचा आकार कमी होत गेला, अखेरीस तो तुटून पडल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. अंटार्टिका हा जगातील सर्वाधिक शीत तापमानाचा खंड सून, तिथे मोठ्या प्रमाणात बर्फ आहे. सद्यस्थितीत त्या प्रदेशावर उष्णतेमुळे परिणाम होतो आहे.

  समुद्राच्या जलस्तरात ९ इंचाची वाढ

  या वर्षी पहिल्यांदाच या भागात कमी बर्फ झालेला असताना हा डोंगर कोसळला आहे. या परिसरात समुद्राला बर्फाने वेढलेले असते. बर्फाने समुद्र अच्छादलेल्या असल्याने असे प्रकार घडल्यानंतरही तो बर्फ पाण्यात मिसळत नाही. तसेच असे मोठे बर्फाचे तुकडेही वितळून समुद्रात जाण्यापासून रोखतात. अन्यथा समुद्राचा स्तर वाढण्याची भीती असते. त्यामुळे काही परिसरात पाणी शिरण्याचीही शक्यता असते.

  अंटार्टिकात यावेळी इतकी उष्णता यापूर्वी नव्हती, असे शास्त्रज्ञ, अभ्यासकांचे मत आहे. हे चांगले लक्षण नाही असेही सगळेच तज्ज्ञ मानतायेत. अंटार्टिका खंडात इतके मोठे पाणी बर्फाच्या रुपात आहे की, ते जर वितळले तर समुद्राचा जलस्तर २०० फुटांनी वाढण्याची शक्यता आहे. तर एका अभ्यासानुसार १८८० नंतर आत्तापर्यंत ९ इंच समुद्राची उंची वाढलेली आहे. यातील एक तृतियांश पाणी हे ग्रीन लँड आणि अंटार्टिका खँडातील बर्फ वितळल्याने आल्याचे सांगण्यात येते आहे.