लष्कराच्या बसवर दहशतवादी हल्ला, ११ सैनिकांसह १३ ठार

उत्तर सीरियामध्ये सोमवारी लष्कराच्या बसवर झालेल्या हल्ल्यात १३ सैनिक ठार तर दोन जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सीरियाच्या सरकारी मीडियाने  ही माहिती दिली आहे.

    दमास्कस : उत्तर सीरियामध्ये सोमवारी लष्कराच्या बसवर झालेल्या हल्ल्यात १३ सैनिक ठार तर दोन जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सीरियाच्या सरकारी मीडियाने  ही माहिती दिली आहे.
    सरकारी टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला रक्का प्रांतात करण्यात आला, जो एकेकाळी ‘इस्लामिक स्टेट’ या अतिरेकी संघटनेच्या ताब्यात होता. बसवर मशिन गनच्या गोळ्यांनी हल्ला करण्यात आला होता किंवा क्षेपणास्त्राचा किंवा रस्त्यावरील बॉम्बस्फोटाचा प्रकार  होता हे अहवालात सांगण्यात आलेले नाही.
    या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही, मात्र या हल्ल्यामागे IS दहशतवाद्यांचा हात असू शकतो, असे संकेत मिळाले आहेत. आयएसच्या अतिरेक्यांनी गेल्या काही महिन्यांत असे अनेक हल्ले केले आहेत, ज्यात डझनभर लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे किंवा जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी 2014 मध्ये इराक आणि सीरियाच्या एक तृतीयांश भागावर तथाकथित “खिलाफत” घोषित केले आणि रक्का शहर ही त्यांची वास्तविक राजधानी होती.
    2019 मध्ये त्यांचा पराभव झाला, पण IS च्या ‘स्लीपर सेल’ अजूनही सक्रिय आहेत आणि प्राणघातक हल्ले करत आहेत. अशा हल्ल्यांसाठी सीरियन अधिकारी नियमितपणे इस्लामिक स्टेटला जबाबदार धरत आहेत. पूर्व, उत्तर आणि मध्य सीरियामध्ये दहशतवाद्यांचे स्लीपर सेल सक्रिय आहेत.