दहशतवाद ग्लोबल चॅलेंज; लढण्यासाठी जगाला एकत्र यावे लागेल

रुचिरा कंबोज यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, दहशतवादाविरुद्धची लढाई तेव्हाच मजबूत होऊ शकते, जेव्हा दोषींना शिक्षा होईल. जगाच्या एका भागातील दहशतवाद हा संपूर्ण जगाच्या शांतता आणि सुरक्षिततेला धोका आहे. म्हणूनच या आंतरराष्ट्रीय आव्हानाला आपला प्रतिसाद एकात्मिक, समन्वित आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रभावी असणे आवश्यक आहे.

    नवी दिल्ली – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये (UNSC) भारताने पुन्हा एकदा दहशतवाद (Terrorism) हा जगासाठी सर्वात मोठा धोका असल्याचे सांगितले. संयुक्त राष्ट्रातील (United Nations) भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज (Ruchira Kamboj) म्हणाल्या, झिरो टॉलरन्स दृष्टिकोनातून दहशतवाद संपवला जाऊ शकतो.

    इराकमध्ये सरकार आणि जनता इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIL) या दहशतवादी गटाशी लढत आहे. दहशतवाद हे जागतिक आव्हान आहे. दहशतवादाचा धोका झपाट्याने वाढत आहे आणि जगाचा कोणताही भाग यापासून अस्पर्श राहिलेला नाही. हे थांबवण्यासाठी झिरो टॉलरन्सचा दृष्टिकोन स्वीकारावा लागेल.

    रुचिरा कंबोज यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, दहशतवादाविरुद्धची लढाई तेव्हाच मजबूत होऊ शकते, जेव्हा दोषींना शिक्षा होईल. जगाच्या एका भागातील दहशतवाद हा संपूर्ण जगाच्या शांतता आणि सुरक्षिततेला धोका आहे. म्हणूनच या आंतरराष्ट्रीय आव्हानाला आपला प्रतिसाद एकात्मिक, समन्वित आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रभावी असणे आवश्यक आहे. दहशतवादाबाबत दुटप्पी मापदंड स्वीकारता येणार नाही.