थायलंडमध्ये भीषण रस्ता अपघात, 11 ठार ;  सुटीनिमित्त बँकॉकला जात होते

घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन सेवेचे लोक तेथे पोहोचले. त्यांनी जखमीला आणि 11 मृतदेहांना रुग्णालयात नेले. त्याचवेळी या अपघातातून बचावलेल्या एका 20 वर्षीय विद्यार्थ्याने सांगितले की, हा अपघात कसा झाला हे मला माहीत नाही. व्हॅनमध्ये बसल्यानंतर त्याला झोप लागली होती. यानंतर तो मोठ्या आवाजाने जागा झाला. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याने पाहिले की व्हॅनला आग लागली होती, त्यानंतर तो लगेच खिडकीतून बाहेर पडला.

    नवी दिल्ली – थायलंडमध्ये लुनर इयरच्या सुटीदरम्यान दोन मुलांसह 11 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. पोलिसांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा 12 लोक सुटी घालवण्यासाठी व्हॅनमधून बँकॉकला जात होते. दरम्यान, सिखियो जिल्ह्यात धक्क्याने व्हॅन उलटून तिला आग लागली. एएफपीनुसार, एक मुलगा व्हॅनच्या खिडकीतून बाहेर पडल्याने वाचला. इतर सर्वजण आत अडकले आणि भाजल्याने मरण पावले.

    आग लागल्यानंतर काही सेकंदांत व्हॅनचा स्फोट
    घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन सेवेचे लोक तेथे पोहोचले. त्यांनी जखमीला आणि 11 मृतदेहांना रुग्णालयात नेले. त्याचवेळी या अपघातातून बचावलेल्या एका 20 वर्षीय विद्यार्थ्याने सांगितले की, हा अपघात कसा झाला हे मला माहीत नाही. व्हॅनमध्ये बसल्यानंतर त्याला झोप लागली होती. यानंतर तो मोठ्या आवाजाने जागा झाला. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याने पाहिले की व्हॅनला आग लागली होती, त्यानंतर तो लगेच खिडकीतून बाहेर पडला.आपत्कालीन सेवांसह घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिक बचाव पथकाचे निखोम झिऑन यांनी सांगितले की, आग लागल्यानंतर काही सेकंदांत व्हॅनचा स्फोट झाला. अवघ्या 30 सेकंदात संपूर्ण व्हॅन जळून राख झाली. सियोन म्हणाला- मी फक्त उभा राहून पाहत होतो, काहीही करू शकत नाही. व्हॅन उलटल्यानंतर रस्त्यावर सांडलेले इंधन हे आगीचे मुख्य कारण असल्याचे आम्हाला वाटते. मात्र, हा संपूर्ण अपघात कसा झाला, याचा तपास सुरू आहे.