बाप नाही हा तर निघाला हैवान! ३९ दिवसाच्या बाळाची ७१ हाडं मोडली अन्

बाळाच्या डोक्याला मार लागला होता, यामुळे रक्तस्त्रावही झाला होता. क्लार्कनं आपल्या बाळाला खूप जोरजोरात फिरवलं होतं, यातच त्याची हाडे तुटली आणि डोक्यातून रक्त येऊ लागलं. कोर्टानं याप्रकरणी शिक्षा सुनावताना म्हटलं, की हत्येची प्रत्येक घटना केवळ एक जीव घेत नाही. तर, दुसऱ्यांनाही यामुळे गंभीर पद्धतीनं प्रभावित करते आणि हे अतिशय निर्दयी कृत्य आहे.

  क्रूरतेचा कळस गाठणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. यात एका जन्मदात्याने क्रूरतेच्या आपल्या ३९ दिवसाच्या बाळाला इतक्या जोरात आदळलं की या बाळाची ७१ हाडे फ्रॅक्चर झाली. याघटनेनंतर बाळाचा मृत्यू झाला. ही घटना ब्रिटनच्या साउथ ग्लूस्टरशायर येथील वार्मलीची आहे. न्यायालयानं याप्रकरणी ३१ वर्षीय आरोपी जेम्स क्लार्क याला या हत्येसाठी शिक्षा सुनावली आहे.

  नेमकं काय घडले?
  डेली मेलच्या वृत्तानुसार, ही घटना तीन वर्ष जुनी आहे आणि जानेवारी २०१८ मध्ये क्लार्कनं आपला मुलगा शॉन क्लार्क याला झोपवण्याआधी अशा पद्धतीनं आदळलं की यात त्याची ७१ हाडे तुटली आणि बाळाचा मृत्यू झाला. जेम्स क्लार्कनं रात्री आपल्या मुलाला झोपवलं आणि मग तो स्वतःही झोपण्यासाठी गेला.
  ३१ वर्षीय जेम्स क्लार्क यानं आपल्या ३९ दिवसांच्या मुलाचे ७१ हाडे मोडली. आता कोर्टानं बाळाच्या हत्येच्या गुन्ह्यात क्लार्कला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

  या घटनेनंतर बाळाच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं आणि त्याचा मृत्यू झाला. बाळाची आई हेलेन जेरेमी हिनं म्हटलं, की दुसऱ्या दिवशी तिला हे बाळ मृतावस्थेत आढळलं. बाळाच्या मृत्यूनंतर त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं, यात असं स्पष्ट झालं की शॉन क्लार्कवर त्याच्या वडिलांनी कमीत कमी तीन वेळा हल्ला केला होता. यात त्याच्या शरीरातील ७१ हाडे तुटली होती.

  यात असाही खुलासा झाला की, बाळाच्या डोक्याला मार लागला होता, यामुळे रक्तस्त्रावही झाला होता. क्लार्कनं आपल्या बाळाला खूप जोरजोरात फिरवलं होतं, यातच त्याची हाडे तुटली आणि डोक्यातून रक्त येऊ लागलं. कोर्टानं याप्रकरणी शिक्षा सुनावताना म्हटलं, की हत्येची प्रत्येक घटना केवळ एक जीव घेत नाही. तर, दुसऱ्यांनाही यामुळे गंभीर पद्धतीनं प्रभावित करते आणि हे अतिशय निर्दयी कृत्य आहे.