The couple had been tying each other's hands for 123 days, now they had a breakup

कपलची चेन तोडणारा व्यक्ती लोपुही जोरिनने लिहिले की, 'हे कपल रजिस्ट्री कार्यालयात चेन कापणार होतं. जेणेकरून स्टीलचे हे बंधन तोडून ते लग्नाच्या बंधनात बांधले जातील. पण मला त्याचा स्थानावर ही चेन कापावी लागली जिथे14 फेब्रुवारीला त्यांना चेन बांधली होती'. व्हॅलेंटाइन डे पासूनच हे कपल एकमेकांना बांधले गेलेले होते. शॉवर घेण्यापासून ते बाथरूम वापरण्यापर्यंत ते सतत सोबत राहत होते. एकत्र शॉपिंग करत होता, सिनेमे बघत होते, झोपत होते आणि दुसऱ्यांना भेटतही सोबत होते.

    युक्रेनच्या एका कपलने नॅशनल टीव्हीवर ब्रेकअप केले. हेच कपल गेल्या 123 दिवसांपासून हँडकफने एकमेकांसोबत जुळलेले होते. फेब्रुवारीमद्ये खार्किवच्या 33 वर्षीय ऑनलाइन कार विक्रेता अलेक्झांडर साशा कुडले आणि 29 वर्षीय ब्युटीशियन व्हिक्टोरिया वीका पुस्तोवितोवाने एक प्रयोग म्हणून आपले तुटत असलेले नातं वाचविण्यासाठी हँटकफ बांधून राहण्याचा निर्णय घेतला होता.

    कपलची चेन तोडणारा व्यक्ती लोपुही जोरिनने लिहिले की, ‘हे कपल रजिस्ट्री कार्यालयात चेन कापणार होतं. जेणेकरून स्टीलचे हे बंधन तोडून ते लग्नाच्या बंधनात बांधले जातील. पण मला त्याचा स्थानावर ही चेन कापावी लागली जिथे14 फेब्रुवारीला त्यांना चेन बांधली होती’. व्हॅलेंटाइन डे पासूनच हे कपल एकमेकांना बांधले गेलेले होते. शॉवर घेण्यापासून ते बाथरूम वापरण्यापर्यंत ते सतत सोबत राहत होते. एकत्र शॉपिंग करत होता, सिनेमे बघत होते, झोपत होते आणि दुसऱ्यांना भेटतही सोबत होते.

    जसजसे दिवस पुढे गेले साशा आणि वीका यांना त्यांच्या पर्सनल स्पेसची कमतरता जाणवू लागली होती. आणि ते मनातून वेगळे होते गेले. कपलने 17 जूनला मीडियासमोर त्यांच्या हातांना बांधलेली चेन तोडली. यावेळी एका मोठ्या कटरने ही चेन कापण्यात आली. मिररनुसार, वीका जिने कधी साशासोबत लग्न करण्याचा प्लॅन केला होता. एकमेकांसोबत चेनने बांधलेले असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

    अलेक्झांडरने त्याच्या संयुक्त सोशल मीडियावर अकाऊंटवर लिहिले की, जेव्हा आम्ही एखाद्या स्थितीत एक प्लस शोधत होतो, तेव्हा आम्हाला दोन मायनस मिळत होते. वीकाला तिच्या आधीच्या जगण्यात परत जायचे होते. ज्या गोष्टी करायला तिला आवडत होत्या त्यांची तिला आठवण येत होती. त्या गोष्टी माझ्यासोबत करण्याचा ती विचार करू शकत नव्हती. नंतर वीकाने सांगितले की, ती त्यावेळी एक स्वतंत्र व्यक्तीच्या रूपात जगू आणि वाढू शकत नव्हती.