The door of the moving plane opened and two passengers got down, along with the dog

न्यूयॉर्कच्या डेल्टा एअरलाईन्सचं विमान न्यूयॉर्कहून अटलांटाकडे निघाले होते. दरम्यान विमान उड्डाण करण्यासाठी रनवेवर आले असताना दोन प्रवाशांनी विमानाचा दरवाजा खोलला आणि विमानातून बाहेर पडले.

न्युयॉर्क : विमान उड्डण करण्यासाठी सज्ज असताना. अचानक दोन प्रवाशांनी आपातकालीन दरवाजा उघडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उड्डाण करण्यासाठी विमान रनवेकडे जात होते. यादरम्यान दाम्पत्याने उतरण्यासाठी विमानाचा आपात्काली दरवाजा उघडला. आणि विमानातून बाहेर पडल्याची माहिती एअरलाईन्सच्या प्रवक्त्याने दिली आहे.

न्यूयॉर्कच्या डेल्टा एअरलाईन्सचं विमान न्यूयॉर्कहून अटलांटाकडे निघाले होते. दरम्यान विमान उड्डाण करण्यासाठी रनवेवर आले असताना दोन प्रवाशांनी विमानाचा दरवाजा खोलला आणि विमानातून बाहेर पडले. त्यांच्यासह त्यांचा कुत्राही विमानातून बाहेर आला. या प्रवाशांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एन्टोनियो आणि ब्रिअना असे ताब्यात घेतलेल्या प्रवाशांचे नाव आहे.

हे दोघेही फ्लोरिडामधील रहिवासी आहेत. विमानात चढल्यापासून हे दोघेही आपली आसने वारंवार बदलत होते. यातीन एका प्रवाशाने पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरचा सामना करत असल्याचा दावा केला आहे. या घटनेनंतर विमानातून सर्व प्रवाशांना उतरवण्यात आले आणि दुसऱ्या विमानात बसवून अटलांटाला पाठवण्यात आले आहे.