अमेरिकेतील बहुचर्चित जॉर्ज फ्लॉईड प्रकरणाचा अखेर निकाल, दोषी पोलीस अधिकारी डेरेक शॉविनला २२ वर्षांचा कारावास

या प्रकरणाच्या सुनावणीकडे सगळ्या जगाचे लक्ष होते. माजी पोलीस अधिकारी डेरेकने ज्या प्रकाराने फ्लॉईड यांची हत्या केली, ती पाहता कुणी लहान मुलगाही यात पोलीस दोषी असल्याचे सांगेल, असा युक्तिवाद फ्लॉईड यांच्या वकिलाने ज्युरींसमोर केला. तर डेरेनच्या वकिलांनी त्याच्या बचावासाठी प्रयत्न केले. डेरेक शॉविन याने केलेली कारवाई योग्य असल्याचे सांगत ४६ वर्षीय फ्लॉईड यांचा मृत्यू ह्रद्यविकाराने आणि अमली पदार्थांमुळे झाल्याचा दावा डेरेनच्या वकिलांनी केला होता.

  वॉशिग्टंन : अमेरिकेतील बहुचर्चित जॉर्ज फ्लॉईड प्रकरणी अखेर कोर्टानं निर्णय दिला आहे. फ्लाईड हत्या प्रकरणातील दोषी माजी पोलीस अधिकारी डेरेक शॉविन याला २२ वर्षे ६ महिन्यांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २५ मे २०२० रोजी घडलेल्या या घडनेनेतंर, एक वर्ष ३२ दिवसांनी या खटल्याचा निकाल लागला आहे. कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर डेरेक शॉविन याचा जामीन तातडीने रद्द करुन त्याला अटक करण्यात आली आहे. फ्लॉईड हत्येचे प्रकरण ज्युरींकडे सोपविण्यात आले होते, अमेरिकेतील वर्णसंघर्षामुळे य़ात ६ गोऱ्या आणि ६ काळ्या वर्णातील ज्य़ुरींचा समावेश करण्यात आला होता.

  डेरेकला वाचवण्याचा वकिलांचा प्रयत्न फोल

  या प्रकरणाच्या सुनावणीकडे सगळ्या जगाचे लक्ष होते. माजी पोलीस अधिकारी डेरेकने ज्या प्रकाराने फ्लॉईड यांची हत्या केली, ती पाहता कुणी लहान मुलगाही यात पोलीस दोषी असल्याचे सांगेल, असा युक्तिवाद फ्लॉईड यांच्या वकिलाने ज्युरींसमोर केला. तर डेरेनच्या वकिलांनी त्याच्या बचावासाठी प्रयत्न केले. डेरेक शॉविन याने केलेली कारवाई योग्य असल्याचे सांगत ४६ वर्षीय फ्लॉईड यांचा मृत्यू ह्रद्यविकाराने आणि अमली पदार्थांमुळे झाल्याचा दावा डेरेनच्या वकिलांनी केला होता.

  ८ मिनिटे ४६ सेकंद दाबून ठेवला होता गळा

  मिनेपोलीस येथे गेल्यावर्षी झालेल्या एका आंदोलनात, फ्लॉईड यांना डेरेक शोविन याने रस्तात पकडले होते. यावेळी झालेल्या झटापटीत डेरेकने आपल्या गुडघ्याने फ्लॉईड यांचा गळा ८ मिनिटे ४६ सेकंद दाबून ठेवला होता. फ्लॉईड यांच्या हातात हातकड्या घालण्यात आल्या असल्याने, ते स्वताचा बचाव करु शकत नव्हते. गळ्यावरील दाब काढावा, अशी विनवणी सातत्याने फ्लॉईड हे डेरेनला करत होते. मात्र डेरेन ऐकण्याच्या स्थितीत नव्हता.

  या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. या व्हिडिओत फ्लॉईड पोलीस अधिकाऱ्याला ‘तुमचा गुडघा माझ्या मानेवर आहे, मला श्वास घेता येत नाहीय’ असं वारंवार सांगत होता. यानंतर हळूहळू फ्लॉईड यांचा श्वास थांबला. यानंतर डेरेक यांनी फ्लॉईडना सांगितले की उठ आणि गाडीत बस, मात्र यावर फ्लॉईड यांच्याकडून कोणतेच उत्तर आले नाही. यावेळी तिथे मोठी गर्दीही जमा झाली होती. त्यानंतर फ्लॉईडना रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्यांचा मृत्यू झाला.

  फ्लॉईड हत्येनंतर उसळल्या दंगली

  जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत अनेक शहरांमध्ये दंगली झाल्या होत्या. फ्लाईड यांच्या मृत्यूच्या संतापाने लाखो नागरिक रस्त्यांवर उतरले होते. या प्रकरणात एप्रिल २०२१ मध्ये माजी पोलीस अधिकारी डेरेक शॉविनला दोषी ठरविण्यात आले होते. या मृत्यूप्रकरणानंतर मिनेपोलीस सिटी कौन्सिल आणि फ्लॉईड यांच्या कुटुंबात करार झाला होता. त्यानुसार फ्लॉईड यांच्या कुटुंबाला २.७ कोटी डॉलर्स नुकसानभरपाईच्या स्वरुपात देण्यात आले होते.