The government should ban international airlines, demanded Congress leader Prithviraj Chavan

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी फेसबुकद्वारे पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, विषाणूच्या नव्या प्रकारामुळे ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे.

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा झपाट्याने वाढत आहे. कोरोना नव्या रुपात हाहाकार घालत आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये पुन्हा निर्बंध लादण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय विमान सेवाही स्थगित करण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला आहे. ब्रिटनसह अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करा असे आवाहन काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला केले आहे.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी फेसबुकद्वारे पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, विषाणूच्या नव्या प्रकारामुळे ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे. सरकारने तेथून येणारी संपुर्ण प्रवासी हवाई वाहतूक ताबडतोब स्थगित केली पाहीजे.

विषाणूच्या नव्या प्रकारामुळे #UK मध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे. सरकारने तेथून येणारी संपुर्ण प्रवासी हवाई वाहतूक ताबडतोब स्थगित केली पाहीजे.

Posted by Prithviraj Chavan on Sunday, December 20, 2020

सध्याची स्थिती फारच भयानक आहे. लस येईपर्यंत ही स्थिती हाताळणे आमच्यासाठी एक मोठेच आव्हान होऊन बसले आहे. आज एक तृतीयांश ब्रिटन लॉकडाऊनखाली आणण्यात आहे असे सांगण्यात येत आहे.पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी सांगितले की नवीन विषाणुंचा प्रसार अत्यंतच घातक ठरत असल्याने अनेक ब्रिटीश नागरीकांना आपला ख्रिसमसचा प्लॅन रद्द करावा लागेल.