जी टोपी भारतीयांनी घालणे कधीचे सोडले, ती टोपी अमेरिकेत विकली जाते आहे २२०० रुपयांना

  वॉशिंग्टन- सध्या देशभरात थंडी चालू आहे, अशा स्थितीत फॅशनची डिमांडही वाढीस लागते. भारतात तर या वर्षी घेतलेल्या कपड्यांची फॅशन पुढच्या वर्षीपर्यंत जुनी झालेली असते. मग ते कपडे बासनात बांधले जातात, चुकून कधी घातले गेलच तर त्यांना ओल्ड फॅशन म्हणून हिणवलेही जाते. मात्र बरेच जण याकडे ठरवून दुर्लक्षही करणारे आहेत. ते चांगले आहे, ते वापरावे या मताचे ते आहेत. कोण काय म्हणते, याकडे त्यांचे लक्ष अजिबात नसते. स्वताला कम्फर्ट मिळतोका, हे अशा मंडलींसाठी विशेष महत्त्वाचे असते.

  अशीच एक काळाच्या ओघात आपल्याकडून हद्दपार झालेली मंकी टोपी आपवल्याला माहिती असेलच. थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी या टोपीचा वापर आधीची पिढी करीत असे. जुन्या चित्रपटांमध्ये अनेक रखवालदारांच्या डोक्यावरही तुम्ही अशा टोप्या पाहिल्या असलाच. आपल्या घरातही जुन्या कपड्यांत अशी एखादी आजोबांची टोपीही असेल. सध्या आपल्याकडे ही मंकी कॅप कालौघात लुप्त झाली असली तरी सध्या याची क्रेझ आहे ती अमेरिकेत. ऐकून आश्चर्य वाटलं ना, पण हे खरं आहे. सध्या ही कॅप अमेरिकेते हजारो रुपयांना विकली जाते आहे.

  ३० डॉलर्समध्ये विकली जाते आहे मंकी कॅप

  अमेरिकेतील एक ब्रँड असलेलेया शॉप अले यांनी मंकी क२पशी मिळतीजुळती डिझाईन सध्या मार्केटमध्ये आणली आहे. एकाप्रकाराने मंकी कॅपचे नवे डिझाईनच म्हटले तरी चालेल. यात त्यांनी कॅपसोबत स्कार्फ म्हणजेच मफलरही जोडले आहे. आता हे नवे डिझाईन सध्या बाजारात चर्चेचा विषय झाले आहे. त्याची किमंत आहे ३० डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांत त्याची विक्री होते आहे २२०० रुपयांना.

  आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की ही आपल्या बाजारात २००-३०० रुपयांना मिळणारी कॅप एवढे पैसे दून अमेरिकन नागरिक का विकत घेतायेत. फॅशनला मोल नसते हेच त्याचे सार म्हणावे लागेल. दुसरे काही नाही.

  ऑनलाईनवर ही टोपी आणि त्याची किंमत पाहून काही भारतीयांचा संताप झाला नसता तरच नवल.. भारतीय कंपन्यांनी याचे कॉपीराईट्स धिकार वापरुन याप्रकरणी कोर्टात जायला हवे असे मत एका युझरने व्यक्त केले आहे. अनेकांनी ही तर मंकी कॅप असे म्हणून आपल्या जुन्या आठवणींना उजाळाही दिला आहे.

  हा प्रकार पहिल्यांदाच झालेला नाही. यापूर्वीही आपल्याकडील इंडिन कुर्ता एका कंपनीने २.५ लाख रुपयांना अमेरिकेते विकला होता. ज्याची आपल्याकडे भारतीय बाजारातील किंमत होती फक्त ५०० ते १००० रुपये. थोडक्यात काय तर आपल्याकडेच केवळ फॅशन म्हणून विदेशातील कपडे येत नाहीत, तर आपले कपडे, वस्तूही विदेशात फॅशन म्हणून पाहिल्या जातातच.