यूकेतून एक अशी बातमी समोर आली आहे जी वाचून तुम्ही हैराण तर व्हालच सोबतच कपाळावर हात मारून घ्याल. हे वाचून तुम्ही विचारात पडाल की, अखेर दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी एखादी व्यक्ती स्वत:चे इतके नुकसान कसे करू शकते. इथे एका व्यक्तीच्या घराला आग लागली. त्याच्या घराची किंमत 550,000 यूरोच्या आसपास होती. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम 4 कोटी इतकी होती.
यूके : यूकेतून एक अशी बातमी समोर आली आहे जी वाचून तुम्ही हैराण तर व्हालच सोबतच कपाळावर हात मारून घ्याल. हे वाचून तुम्ही विचारात पडाल की, अखेर दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी एखादी व्यक्ती स्वत:चे इतके नुकसान कसे करू शकते. इथे एका व्यक्तीच्या घराला आग लागली. त्याच्या घराची किंमत 550,000 यूरोच्या आसपास होती. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम 4 कोटी इतकी होती.
आगीची चौकशी केल्यावर समोर आले की, हे प्रकरण फारच विचित्र आहे. या व्यक्तीचे नाव जॉन आहे. त्याचे घर लवकरच विकले जाणार होते. घर विकले जाणार त्याच्या तीन दिवसआधी जॉनने स्वत:च त्याच्या घराला पेटवून दिले. त्याने ब्लोटॉर्चच्या मदतीने आपल्या घराला आग लावली. त्याने त्याच्या घराला यामुळे आग लावली याचे हैराण करणारे कारण समोर आले. त्याची पत्नी जी आता त्याच्यासोबत राहत नाही. तिलाही या घरात हिस्सा द्यावा लागला असता. पण जॉनला तिला हिस्सा द्यायचा नव्हता. त्यामुळे त्याने आपल्या घराला आग लावली.
माहितीनुसार, 17 जूनच्या रात्री जॉन दारू पित बसला होता. त्याच रात्री त्याने घराला आग लावण्याचा निर्णय घेतला. त्याने या घराचे प्रिमिअमही भरले नव्हते. म्हणजे घराचा विमाही नव्हता. तेच त्याची पत्नी हिलेरी म्हणाली की, ती पती जॉनला सोडून फार आनंदी आहे. मी त्याला सोडून गेली म्हणून तो फार रागात होता. मला वाटते त्याने हे घर मला हानी पोहोचवण्यासाठी जाळले. जॉनने कोर्टात हे मान्य केलं की, त्याने मुद्दामहून त्याच्या घराला आग लावली नाही. तो त्यावेळी नशेत होता. शॉकमध्ये होता त्यामुळे ही दुर्घटना घडली.