The largest volcanic eruption in Indonesia; 14 killed; Hundreds of civilians were injured

इंडोनेशियाच्या जावा या सर्वाधिक दाट लोकसंख्येच्या बेटावरील सर्वात मोठ्या ज्वालामुखीचा शनिवारी पुन्हा उद्रेक झाला. आसमंतात राखेचा प्रचंड धूर पसरल्याने नागरिक भयभीत झाले. यात १४ जणांचा मृत्यू झाला असन शेकडो जण जखमी झाले आहेत(The largest volcanic eruption in Indonesia; 14 killed; Hundreds of civilians were injured).

    जकार्ता : इंडोनेशियाच्या जावा या सर्वाधिक दाट लोकसंख्येच्या बेटावरील सर्वात मोठ्या ज्वालामुखीचा शनिवारी पुन्हा उद्रेक झाला. आसमंतात राखेचा प्रचंड धूर पसरल्याने नागरिक भयभीत झाले. यात १४ जणांचा मृत्यू झाला असन शेकडो जण जखमी झाले आहेत(The largest volcanic eruption in Indonesia; 14 killed; Hundreds of civilians were injured).

    माऊंट सेमेरू असे या ज्वालामुखीचे नाव असून तो पूर्व जावाच्या लुमाजांग जिल्ह्यात आहे. त्याच्या आसपासच्या गावांतील घरांवर राखेचे थर जमा झाले आहेत. उद्रेक सुरू होताच वादळी पाऊसही सुरू झाला.

    लाव्हारस आणि पावसात तयार झालेला चिखल यांच्या रेट्याने येथील एक पूल नष्ट झाला. शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.