The maximum of Chinese astronauts; Step placed in the space station

‘स्‍पेस सुपरपॉवर’ बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या चीनच्या 3 अंतराळविरांनी मोठी कमाल केली आहे. सुमारे 7 तासाच्या अंतराळ प्रवासादरम्यान या 3 अंतराळविरांनी चीनच्या अंतराळ स्थानकात अर्थात स्पेस स्टेशनमध्ये पहिले पाऊल ठेवण्यात यश मिळविले आहे. अंतराळ स्थानकाची निर्मिती आणि त्यात पाऊल ठेवण्याची ही सुवर्ण कामगिरी खगोल विज्ञान जगतातील एक मोठे यश म्हणून पाहिली जात आहे. या ऐतिहासिक घटनेचा व्हीडिओ चिनी अंतराळ संस्थेने जारी केला आहे. या व्हीडिओत चीनी अंतराळवीर आपल्या स्पेस स्टेशनचा दरवाजा उघडून त्यात शिरताना दिसत आहे.

  पेइचिंग : ‘स्‍पेस सुपरपॉवर’ बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या चीनच्या 3 अंतराळविरांनी मोठी कमाल केली आहे. सुमारे 7 तासाच्या अंतराळ प्रवासादरम्यान या 3 अंतराळविरांनी चीनच्या अंतराळ स्थानकात अर्थात स्पेस स्टेशनमध्ये पहिले पाऊल ठेवण्यात यश मिळविले आहे. अंतराळ स्थानकाची निर्मिती आणि त्यात पाऊल ठेवण्याची ही सुवर्ण कामगिरी खगोल विज्ञान जगतातील एक मोठे यश म्हणून पाहिली जात आहे. या ऐतिहासिक घटनेचा व्हीडिओ चिनी अंतराळ संस्थेने जारी केला आहे. या व्हीडिओत चीनी अंतराळवीर आपल्या स्पेस स्टेशनचा दरवाजा उघडून त्यात शिरताना दिसत आहे.

  3 महिने चालणार प्रयोग

  चीनचे हे तिन्ही अंतराळवीर पुढील तीन महिने या अंतराळ स्थानकात राहून विविध प्रकारचे प्रयोग करतील. चायना मॅन्ड स्पेस एजंसीनुसार (सीएमएसए) शेझाउ-12 अंतराळ यान गुरुवारी दुपारी अंतराळ स्थानकातील कोर मॉड्यूल तियान्हेशी जुळल्यानंतर ऑर्बिटर कॅप्सूल स्थानकात शिरले. चिनी अंतराळविरांनी पहिल्यांदाच आपल्या स्वत:च्या अंतराळ स्थानकात प्रवेश केला आहे. सीएमएसएने आपले अंतराळ यान गुरुवारी सकाळी अंतराळ स्थानकाच्या दिशेने रवाना केले होते.

  संपूर्ण जगावर ठेवू शकतील लक्ष

  अंतराळ यान लाँ मार्च-2 एफ रॉकेटसह उत्तर पश्चिम चीनच्या गोबी वाळवंटातील जियुक्वान उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरून रवाना करण्यात आले होते. या अभियानाचे अधिकृत टीव्ही चॅनेल्सवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. या माध्यमातून चीन आता संपूर्ण जगावर लक्ष ठेऊ शकणार आहे.

  हे सुद्धा वाचा