महापौरानं केलं चक्क मगरीशी लग्न, काय आहे प्रकरण? : जाणून घ्या सविस्तर

लग्न म्हणजे आयुष्यातील अनेक महत्वाच्या निर्णयापैकी एक मानला जातो. लग्नासाठी योग्य जोडीदाराच्या निर्णयापासून ते लग्नानंतरच्या आजिवन प्रवासाची अनेक स्वप्न यावेळी लग्नाळू जोडपे बघत असतात. मात्र मेक्सिकोतील महापौराने चक्क मगरीशी लग्न केलं.

    मेक्सिको : लग्न म्हणजे आयुष्यातील अनेक महत्वाच्या निर्णयापैकी एक मानला जातो. लग्नासाठी योग्य जोडीदाराच्या निर्णयापासून ते लग्नानंतरच्या आजिवन प्रवासाची अनेक स्वप्न यावेळी लग्नाळू जोडपे बघत असतात. मात्र मेक्सिकोतील महापौराने चक्क मगरीशी लग्न केलं. त्यांच्या या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये महापौर या मगरीला हाताशी घेऊन दिसतोय.

    ही घटना आहे मेक्सिको मधील आहे, जिथे सॅन पेड्रो हुआमेल्युलाचे महापौर सेटर ह्यूगो यांनी एका मगरीशी सर्व विधी करून लग्न केले आहे. या लग्नाला हजारो लोक उपस्थित होते. या लग्नातील सर्व विधी वराच्या नातेवाईकांकडून केले जातात. पर्यावरण, मानव आणि प्राणी यांच्यातील नाते सांगणे, हा या विवाहामागचा मुख्य हेतू आहे.


    मिळालेल्या माहितीनुसार मगरीशी लग्न करणे ही मेक्सिकोमधील १७८९ पासून चालत आलेली जुनी परंपरा आहे. असे मानले जाते की असे केल्याने शहरात कधीही वाईट घडत नाही आणि तो परिसर नेहमी लोकवस्तीने भरलेला राहतो. तसेच, असे केल्याने देवाकडून आपल्याला हवे असेल ते सर्व काही मिळते, अशीही येथील मान्यता आहे. याशिवाय बहुतेक लोक केवळ चांगला पाऊस आणि अधिक मासे मिळावेत यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करतात. महापौरांनीही याच हेतूने हा विवाह केला.

    दरम्यान या अंतर्गत मगरीचे पहिले नाव ठेवण्यात आले आहे. यानंतर लग्नाची तारीख ठेवली जाते आणि सर्वांना लग्नाचे आमंत्रण पाठवले जाते. यानंतर सर्वांसमोर विवाह पार पाडला जातो. या लग्नादरम्यान, मगरीला पांढर्‍या लग्नाच्या पोशाखात वधूप्रमाणेच तयार केले जाते. त्यानंतर स्थानिक नेते त्याच्याशी लग्न करतात आणि स्वतःला दैवी पुरुष समजतात. या दरम्यान, ते मादी मगरीचे चुंबन देखील घेतात, परंतु यावेळी मगरीचे तोंड कापडाने बांधलेले असते जेणेकरून ती वराला कोणत्याही प्रकारे इजा करू शकणार नाही.