Guantanamo Bay prison

कारागृह हे नाव आपल्या समोर येताच तेथील सुरक्षा, कैदी तेथील जेवणाची व्यवस्था या सारख्या गोष्टी डोक्यात येतात. मात्र क्यूबामधील एका कारागृहाबद्दल या गोष्टींचा विचार करण्यात काहीही अर्थ नाही. कारण येथील कारागृहात एका कैद्यावर करोडो रूपये खर्च केले जातात. याच कारणामुळे हे जगातील सर्वात महाग कारागृह आहे. या कारागृहाचे नाव ‘ग्वांतानमो बे’ असे आहे. ते क्यूबामध्ये आहे(The most expensive prison in the world! Crores of rupees are spent on one prisoner; The prisoner's life style is such that ).

  कारागृह हे नाव आपल्या समोर येताच तेथील सुरक्षा, कैदी तेथील जेवणाची व्यवस्था या सारख्या गोष्टी डोक्यात येतात. मात्र क्यूबामधील एका कारागृहाबद्दल या गोष्टींचा विचार करण्यात काहीही अर्थ नाही. कारण येथील कारागृहात एका कैद्यावर करोडो रूपये खर्च केले जातात. याच कारणामुळे हे जगातील सर्वात महाग कारागृह आहे. या कारागृहाचे नाव ‘ग्वांतानमो बे’ असे आहे. ते क्यूबामध्ये आहे(The most expensive prison in the world! Crores of rupees are spent on one prisoner; The prisoner’s life style is such that ).

  ग्वांतानमो खाडीच्या तटावर हे कारागृह असल्याने त्यावरून हे नाव देण्यात आले. या कारागृहात सध्या 40 कैदी असून, प्रत्येक कैद्यावर वर्षाला 93 लाख रूपये खर्च केले जातात. या कारागृहाच्या सुरक्षेसाठी तब्बल 1800 सैनिक तैनात असतात. येथे एका कैद्यासाठी 45 सैनिकांची नियुक्ती केली जाते. कारागृहाच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या सैनिकांवर दरवर्षी जवळपास 3900 करोड रूपये खर्च होतात.

  तुम्ही विचार करत असाल की, या कारागृहात कैद्यांना एवढी सुरक्षा का दिली जात आहे ? तर याचे कारण, या कारागृहात सर्वात खतरनाक गुन्हेगारांना ठेवण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, 9/11 हल्ल्या मागील मास्टरमाइंड खालिद शेख मुहम्मदला देखील याच कारागृहात ठेवण्यात आले आहे. या कारागृहात तीन इमारती.

  दोन गुप्त मुख्यालय आणि 3 हॉस्पिटल आहेत. तसेच वकिलांसाठी देखील वेगळे कंपाउंड बनवण्यात आलेले आहे. जेथे ते कैंद्याबरोबर संवाद साधू शकतील. येथील स्टाफ कैद्यांना चर्च आणि सिनेमाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर अन्य कैद्यांसाठी जिम आणि प्ले स्टेशन देखील आहे. आधी ग्वांतानामो बे हे अमेरिकेच्या नौदलाचे बेस कॅम्प होते. मात्र नंतर ते डिटेंशन सेंटर बनवण्यात आले. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जॉर्ज बूश यांनी येथे एक कंपाउंड बनवले होते. या कॅम्पला एक्स रे नाव देण्यात आले आहे.

  हे सुद्धा वाचा
  • 2022