If Biden is elected instead of Trump, will India-US relations remain the same?

अमेरिकेच्या लाईव्ह आय सर्व्हीलांस कंपनीने भारतात बसून अमेरिकेतील कामावर नजर ठेवण्याची संधी भारतीयांना उपलब्ध केली आहे. सीसीटीव्ही मुळे प्रत्यक्ष जागेवर न जाता तेथील सर्व हालचाली टिपता येतात. पण सीसीटीव्ही पाहू शकत असला तरी सूचना देऊ शकत नाही. या कंपनीने ही अडचण राहू नये म्हणून एक अशी नोकरी निर्माण केली आहे की ज्याबद्दल कुणी पूर्वी ऐकले नसेल किंवा पाहिलेही नसेल.

    वॉशिंग्टन : कोरोनामुळे नोकरीचा पॅटर्न व रोजगार संधी यात खुपच बदल झाला आहे. पूर्वी ऑफिसमध्ये जाऊन कामे करावी लागत आता घरातूनच ऑफिसची कामे केली जात आहेत. ज्या कामासाठी पूर्वी अधिक कर्मचारी लागत तीच कामे आता कमी कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने होऊ लागली आहेत. मात्र सुपरव्हिजनचे काम करणारे घरात बसून कसे काम करणार असे वाटत असेल तर त्याचे उत्तर येथे आहे.

    अमेरिकेच्या लाईव्ह आय सर्व्हीलांस कंपनीने भारतात बसून अमेरिकेतील कामावर नजर ठेवण्याची संधी भारतीयांना उपलब्ध केली आहे. सीसीटीव्ही मुळे प्रत्यक्ष जागेवर न जाता तेथील सर्व हालचाली टिपता येतात. पण सीसीटीव्ही पाहू शकत असला तरी सूचना देऊ शकत नाही. या कंपनीने ही अडचण राहू नये म्हणून एक अशी नोकरी निर्माण केली आहे की ज्याबद्दल कुणी पूर्वी ऐकले नसेल किंवा पाहिलेही नसेल.

    व्हर्चुअल सुपरवायझर असे पद असलेल्या या नोकरीसाठी हरियाणाच्या करनाळ मध्ये ओपनिंग आहे. येथे प्रत्यक्ष साईट वर न जाता सुपरवायझरने कर्मचाऱ्यांवर नजर ठेवायची आहे शिवाय कुणी चोर लुटेरे आले तर जोरजोरात आरडाओरड करून पोलिसांना त्यांची माहिती दिली गेल्याचे सांगायचे आहे. त्यासाठी 399 डॉलर्स पगार मिळणार आहे. अर्थात हे काम 24 तासाचे आहे.

    मॉनीटर रिपोर्ट तयार करणे असे स्वरूप असलेल्या या कामासाठी प्रोसेस अॅनालिस्ट असे हे पद आहे. भारतीयांना त्यासाठी प्राधान्य आहे. चांगले बोलणे, संवाद साधणे आणि शिकण्याची क्षमता उमेदवारात हवी. म्हणजे भारतात बसून अमेरिकेतील साईटवर नजर ठेवणे असे या कामाचे स्वरूप आहे.