ब्राझीलमध्ये कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर !ICU बेड संपले, रुग्णांवर खुर्च्यांवर बसवून उपचार घेण्याची वेळ

जगभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत होते मात्र आता ते ब्राझीलमध्ये सापडत आहेत. तर सर्वाधिक मृत्यू देखील याच देशात होत आहेत. त्यात देशातील अनेक रुग्णालयांची क्षमता देखील संपुष्टात आली आहे.

    सध्या ब्राझीलमध्ये कोरोनाने हाहाकार पसरविला आहे. येथील कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली असून आरोग्य व्यवस्थेची भयावह स्थिती निर्माण झाली आहे. येथील आरोग्यव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली असून ICU बेड संपले आहेत तर खुर्च्यांवर बसवून रुग्णांवर उपचार घेण्याची वेळ आली आहे तर दुसरीकडे स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यविधीसाठी रांगा लागलेल्या पाहयला मिळत आहेत. ब्राझीलमध्ये आतापर्यंत १ कोटी २४ लाख नवे कोरोना रुग्ण आढळले असून ३ लाख १० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

    जगभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत होते मात्र आता ते ब्राझीलमध्ये सापडत आहेत. तर सर्वाधिक मृत्यू देखील याच देशात होत आहेत. त्यात देशातील अनेक रुग्णालयांची क्षमता देखील संपुष्टात आली आहे. देशातील २६ पैकी १६ राज्यांमध्ये आयसीयू बेड्सची कमतरता निर्माण झाली आहे. ९० टक्के आयसीयू बेड्स रुग्णांनी व्यापले आहेत. रिओ ग्रँड डो सुल येथे तर आयसीयू केअर युनिटमध्ये दाखल होण्यासाठी गेल्या दोन आठवड्यांत वेटिंग लिस्ट तब्बल दुपटीनं वाढली आहे. बेड्सच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना चक्क खुर्च्यांवर बसून उपचार घ्यावे लागत आहेत.