file photo
file photo

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे की, या हल्ल्यात नागरिकांच्या जीवितहानीचे झालेली नाही. मात्र, कुणी नागरिक जखमी झाला आहे का, याचा शोध लष्कर घेत आहे.

    अमेरिका दहशतवाद संपवण्याकरिता नेहमी काही ना काही मोहीम राबवत असते. आता पुर्व सिरियामध्ये अमेरिकेनं एक मोठी कामगिरी केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या लष्कराने पूर्व सीरियामध्ये एयर स्ट्राईक केली असून यामध्ये इसिसचा एक दहशतवादी मारला गेला. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने रविवारी सांगितले ही माहिती दिली.  अमेरिकेनं केलेल्या ड्रोन हल्ल्यात इसिसचा नेता ओसामा अल-मुहाजिर मारला गेला, अशी माहित समोर आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकी लष्कराने सिरियावर ७ जुलै रोजी हा ड्रोन हल्ला केला होता. या हल्ल्यात एमक्यू-9 ड्रोनचा वापर करण्यात आला. या हल्ल्यात इसिसचा दहशतवादी मारला गेला. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे की, या हल्ल्यात नागरिकांच्या जीवितहानीचे झालेली नाही. मात्र, कुणी नागरिक जखमी झाला आहे का, याचा शोध लष्कर घेत आहे.

    रशियाच्या विमानांनाही सामोरं जावं लागलं

    अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक संदर्भात माहिती देताना युएस सेंट्रल कमांडने सांगितलं आहे की, शुक्रवारी 7 जुलै रोजी पूर्व सीरियातील तळावर एमक्यू-9 ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. यावेळी काही रशियन विमानंही तिथं होती. युएस सेंट्रल कमांडने सीरियाच्या पूर्वेकडील दहशतवादी तळावर हल्ला केला, यावेळी अमेरिकेला रशियाच्या विमानांनाही सामोरं जावं लागलं. यावेळी रशियासोबत दोन तास चकमक चालली.

    यूएस एअर फोर्सने बुधवारी रशियन विमाने आणि एमक्यू-9 ड्रोन यांच्यात दोन तासांची चकमकीचा व्हिडीओ जारी केला आहे. यादरम्यान, MQ-9 रीपर्स ड्रोनने रशियन विमानांना पळवून लावण्यासाठी उत्तम कामगिरी केल्याचं अमेरिकन वायू दलाने सांगितलं आहे. रशियाच्या विमानांकडून अमेरिकेच्या स्ट्राईकमध्ये अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या घटनेवर चिंता व्यक्त करताना, यूएस एअर फोर्स सेंट्रलने एक निवेदन जारी करून सीरियामध्ये कार्यरत असलेल्या रशियन हवाई दलाच्या कारवाईचा निषेध केला.