मास्कचा वापरामुळे संसर्गजन्य आजार कमालीचे घटले – संशोधनातून आले समोर 

ज्यांच्यासाठी श्वसनविषयक संसर्ग अत्यंत हानिकारक ठरू शकतो, तसंच वृद्ध आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींसाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून कोविड प्रतिबंधाच्या उपाययोजना उपयुक्त ठरू शकतात, असं आमच्या अभ्यासातून दिसून आले आहे, त्यामुळे अशा व्यक्तींसाठी मास्कचा वापर फायदेशीर ठरू शकेल.

  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तोंडाला लावण्यात येणार मास्क आता लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. कधी कोरोना असंपतोय आणि आम्ही मास्क काढून टाकतोय असं अनेकांना वाटत आहे. परंतु संशोधनातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या विषाणू रोखण्यासाठी घालावा लागणाऱ्या मास्क मुळे सर्दी, फ्लूचा यासारख्या विषाणूजन्य रोगाचा प्रसारामध्ये प्रचंड घट झालेली दिसून आल्याचे निरीक्षण अमेरिकेतील शास्त्रज्ञानी नोंदवले आहे.

  बॉस्टन मेडिकल सेंटर (Boston Medical Centre – BMC) या केंद्रातल्या शास्त्रज्ञांच्या गटाने कोविड-१९ (Covid-19) महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा श्वसनविषयक अन्य सर्वसाधारण रोगांच्या नियंत्रणासाठी झालेला उपयोग या विषयावर संशोधन केले. त्यात साधारणपणे
  एक जानेवारी २०१५ ते २५ नोव्हेंबर २०२० या कालावधीतल्या बीएमसीमधल्या आंतररुग्ण आणि बाह्यरुग्ण विभागातल्या रुग्णांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात अर्थातच हे विश्लेषण श्वसनसंस्थेच्या विषाणूजन्य रोगांबद्दलचे होते. सार्स सीओव्ही-टू अर्थात कोरोनाचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रिपोर्ट्स त्यातून वगळण्यात आले, जेणेकरून केवळ अन्य सर्वसाधारण श्वसनविषयक रोगांवरच लक्ष केंद्रित केले जाऊ शकेल.

  या संशोधनात २०२०चे दोन कालावधीता विभागणी करण्यात आली पहिला म्हणजे मास्क घालणे , सोशल डिस्टन्सिंग, शाळा बंद करणे आदी उपाययोजना राबवण्यापूर्वीचा आणि दुसरा कालावधी म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाल्यानंतरचा.

  या संशोधनात सहभागी असलेले शास्त्रज्ञ मनीष सागर यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘नेहमीचेच सर्दी-पडसे , न्यूमोनिया (Pneumonia) यांसाठी कारणीभूत असलेले विषाणू जवळच्या संपर्कातून, धूलिकणांतून किंवा नाकातल्या स्रावाद्वारे पसरतात, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळेच कोविड-१९ ला प्रतिबंध करण्यासाठी राबवलेल्या उपायांचा या बाकीच्या रोगांवर कसा परिणाम होतो, ते पाहायचे आम्ही ठरवले

  पुढे या अभ्यासातून जी माहिती समोर आली ती चकित करणारी होती. या माहितीनुसार इन्फ्लुएंझा अर्थात फ्लू (Flu) आणि श्वसनविषयक अन्य सर्वसाधारण विषाणूजन्य रोगांचे प्रमाण वर्षाच्या आधीच्या कालावधीच्या तुलनेत ८० टक्क्यांनी घटले होते. त्यामुळे श्वसनविषयक विषाणूजन्य रोगांच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी कोविड-१९प्रतिबंधक उपाययोजनांचा चांगला उपयोग झाल्याचे आढळून आले . त्यामुळे भविष्यातही त्या कारणासाठी या उपायांचा उपयोग करता येऊ शकेल.

  २०२० मध्ये मास्क, सोशल डिस्टन्सिंग वगैरे लागू केले जाण्याच्या आधीच्या कालावधीत विषाणूजन्य रोगांच्या प्रसाराचे प्रमाण २०१५ ते २०१९ च्या तुलनेत जास्त होते . तसेच, बॉस्टनमध्ये जुलै २०२० मध्ये टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात आले, तेव्हा ऱ्हायनो व्हायरसचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढल्याचं लक्षात आले .

  ‘ज्यांच्यासाठी श्वसनविषयक संसर्ग अत्यंत हानिकारक ठरू शकतो, तसंच वृद्ध आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींसाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून कोविड प्रतिबंधाच्या उपाययोजना उपयुक्त ठरू शकतात, असं आमच्या अभ्यासातून दिसून आले आहे, त्यामुळे अशा व्यक्तींसाठी मास्कचा वापर फायदेशीर ठरू शकेल, असे त्यांनी सुचवले आहे.