पतीसोबत केलेले चॅट पत्नीने सोशल मीडियावर केले शेअर, कोर्टाने पत्नीला सुनावली ही शिक्षा

स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या तपासात, या महिलेनं जानेवारीत आपल्या पतीसोबत अखेरचे चॅटिंग (Chating) केले होते. त्या चॅटिंगचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर (Instagram) अपलोड केले. त्यानंतर या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि प्रकरण कोर्टात गेले.

    दुबई : आपल्या लाईफ पार्टनरच्या प्रायव्हसीचा (Life Partner Privacy) आदर राखणेही अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा ते आपल्याला चांगलेच महागात पडू शकते. दुबईत राहणाऱ्या एका महिलेला याचा चांगलाच अनुभव आला. पतीच्या प्रायव्हसीशी छेडछाड केल्याप्रकरणी, या महिलेला दोषी ठरवत, कोर्टाने (court) तिला ४१ हजार रुपयांचा दंड (fine) ठोठावला आहे. या महिलेनं तिच्या पतीचा फोन नंबर आणि काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचले.

    स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या तपासात, या महिलेनं जानेवारीत आपल्या पतीसोबत अखेरचे चॅटिंग (Chating) केले होते. त्या चॅटिंगचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर (Instagram) अपलोड केले. त्यानंतर या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि प्रकरण कोर्टात गेले. पत्नीच्या अशा वागण्याने त्याच्या वैयक्तिक खासगी आयुष्य (प्रायव्हसीचे) चव्हाट्यावर मांडले आहे, अशी तक्रार त्याने केली होती. तर पत्नीने हे आरोप फेटाळून लावले होते.

    पत्नीने सांगितले की ती आपल्या फ्लॅटमध्ये पाहत होती. एका ॲपच्या माध्यमातून पतीच्या बहिणींशी ती घटस्फोटानंतरच्या पोटगीबाबत ती चर्चा करत होती. अचानक हे कसे घडले हे माहित नसल्याचा दावा तिने सुरुवातीला केला होता. या महिलेचा तिच्या पतीशी घटस्फोटाचा खटलाही सुरु आहे. नंतर मात्र आपल्या मुलांचे आणि पतीसोबत झालेल्या चॅटचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकल्याचे या महिलेने मान्य केले.

    एवढ्याश्या कारणावरुन हे प्रकरण कोर्टात येईल, याची कल्पना नसल्याचेही या महिलेने म्हटले आहे. पतीच्या वकिलांनी या प्रकरणात महिलेवर कठोर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणामुळे व्यथित झाल्याचे या पतीने कोर्टात सांगितले, तसचे गोपनियतेचे उल्लंघन झाल्याचा दावाही त्याने केला होता. कोर्टाने अखेरीस या पत्नीला ४१ हजार रुपयांचा दंड ठोठावला.