
या प्रकरणी स्पेनच्या न्यायालयाने पतीला त्याच्या माजी पत्नीला किमान वेतनावर घरकाम करण्यासाठी १.७९ कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय मुलींना मासिक बालसंगोपन भत्ता देण्याचेही आदेश दिले होते.
भारतात घर सांभाळणाऱ्या महिलांच्या कामाकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात, ते त्यांच कर्तव्य आहे वैगेर असं पारंपारिक वाक्य बोलुन त्याला फार महत्त्व द्यायची तसदी कुणी घेत नाही. त्यामुळे घटस्फोट घेताना घरकामांना गृहीत धरल्या जातं, त्यासाठी त्यांना पैसै मिळणं तर दुरचं राहिलं. मात्र, स्पेनच्या एका कोर्टाने असा निर्णय दिला आहे, ज्याचं जगभरात खुप कौतुक होत आहे. स्पेनच्या न्यायालयानेही महिलांनी केलेली घरकामाला महत्त्वाचं असल्याचं सांगत घटस्फोट घेताना पतीला 204,624.86 युरो म्हणजेच सुमारे 1.79 कोटी रुपये त्याच्या पत्नीला देण्याचे आदेश दिले आहे. ही वेगळी वाटणारी बातमी नेमकी काय आहे, पाहुया.
स्पेनमध्ये 25 वर्षे एकत्र राहिल्यानंतर एका जोडप्याचा घटस्फोट झाला. दोघांना दोन मुली आहेत. दोघांमध्ये मालमत्तेवरून वाद सुरू झाला. विवाहित असताना जे काही कमावले ते स्वतःचे असल्याचे मत पतीने मांडले. त्यामुळे पत्नीचा त्यावर अधिकार नाही. त्याच वेळी, माजी पत्नीच्या वकिलाने सांगितले की, लग्न झाल्यानंतर पत्नीने स्वतःला घरातील कामात झोकून दिले होते, म्हणजे घर आणि कुटुंबाची काळजी घेणे त्यामुळे न्यायालयाने किमान वेतनाच्या आधारे महिलेच्या कामाची गणना केली, आणि तिला पतिकडुन 79 कोटींची पोटगी मिळवुन दिली.
नवरा आणि मुलांची घेतली काळजी
यावर कोर्टाने कायदेशीर कागदपत्रांमध्ये हे देखील पाहिले की लग्नानंतर म्हणजेच जून 1995 ते डिसेंबर 2020 दरम्यान महिलेने किती कमाई केली. कॅडेना सेर रेडिओशी बोलताना महिलेने तिची संपूर्ण कहाणी सांगितली. महिलेने सांगितले की, तिच्या पतीला तिने घराबाहेर कोणतेही काम करावे असे वाटत नव्हते. तथापि, त्याने तिला त्याच्या जिममध्ये काम करू दिले, जिथे तिने रिसेप्शन हाताळले आणि मॉनिटर म्हणून काम केले. याशिवाय घरातील सर्व कामे ती सांभाळत असे. नवरा आणि मुलांची काळजी घेतली.
न्यायालयाचा निकाल काय होता?
या प्रकरणी स्पेनच्या न्यायालयाने पतीला त्याच्या माजी पत्नीला किमान वेतनावर घरकाम करण्यासाठी १.७९ कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय मुलींना मासिक बालसंगोपन भत्ता देण्याचेही आदेश दिले होते. दोघांना दोन मुली आहेत. एक अल्पवयीन आहे, तर दुसरा 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचा आहे.