The world's first ice hotel will melt by April 11, 2021

आर्क्टिक सर्कलपासून २०० किमी अंतरावरील टॉर्न नदीजवळ हे हॉटेल आहे. येथील तापमान उणे १८ ते ४० अंशांपर्यंत असते. येथे दरवर्षी सुमारे ७० हजारांहून जास्त लोक सुटी साजरी करण्यासाठी येतात.

दिल्ली :  स्वीडनचे आइस हॉटेल दरवर्षी पर्यटकांचे आकर्षण ठरते. मात्र, बर्फाचे हे हॉटेल साकार झाल्याच्या पाच महिन्यांनंतर नदीत रूपांतरित होते. यंदा हे हॉटेल ११ एप्रिल २०२१ पर्यंत वितळून जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

स्वीडन १९८९ मध्ये पहिल्यांदा असे भव्य आइस हॉटेल साकारले गेले. यंदा या परंपरेचे ३१ वे वर्ष आहे. यंगवे बर्गक्विस्ट हे त्याचे संस्थापक. लुका रोनकोरोनी हे क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत. दरवर्षी काहीतरी वेगळ इंटीरियर करण्याचा यांचा प्रयत्न असतो.

यंदा कोरोना महामारीचा विचार करून ६ प्रकारच्या सुइटमध्ये १२ बेडरूम, आइसबार, आहेत. आर्क्टिक सर्कलपासून २०० किमी अंतरावरील टॉर्न नदीजवळ हे हॉटेल आहे. येथील तापमान उणे १८ ते ४० अंशांपर्यंत असते. येथे दरवर्षी सुमारे ७० हजारांहून जास्त लोक सुटी साजरी करण्यासाठी येतात. परंतु यंदा महामारीमुळे मर्यादित लोक येण्याची अपेक्षा आहे. म्हणूनच केवळ ६ सुइट तयार केले आहेत. गेल्या वर्षी १२ कक्षांची व्यवस्था करण्याची आली होती.

गेल्या वर्षी १६ देशांतील ३३ कलाकारांनी केवळ एका आठवड्यात असे हॉटेल साकारले होते. यंदा स्वीडनच्या २४ कलाकारांनी हॉटेल प्रत्यक्षात आणले. हे तयार करण्यासाठी १८ दिवसांचा कालावधी लागला. बर्फाच्या ५५० लाद्यांच्या साह्याने हे थंडगार हॉटेल साकारण्यात आले आहे.