
ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट डेल्टापेक्षा धोकादायक असल्याचा अद्याप कोणताही पुरावा नसल्याची माहिती सिंगापूर आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. याबाबत अधिक निष्कर्षासाठी आणि व्हेरिएंटची संरचना जाणून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ओमायक्रॉन व्हेरिएंट इतर व्हेरिएंटपेक्षा धोकादायक असण्याचे किंवा या व्हेरिएंटवर सध्याची कोविड लस प्रभावी नसल्याचे कोणतेही पुरावे नाहीत(There is no evidence that the new variant is more dangerous than the Delta; Is the current covid vaccine effective? Singapore Health Ministry claims).
दिल्ली : ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट डेल्टापेक्षा धोकादायक असल्याचा अद्याप कोणताही पुरावा नसल्याची माहिती सिंगापूर आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. याबाबत अधिक निष्कर्षासाठी आणि व्हेरिएंटची संरचना जाणून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ओमायक्रॉन व्हेरिएंट इतर व्हेरिएंटपेक्षा धोकादायक असण्याचे किंवा या व्हेरिएंटवर सध्याची कोविड लस प्रभावी नसल्याचे कोणतेही पुरावे नाहीत(There is no evidence that the new variant is more dangerous than the Delta; Is the current covid vaccine effective? Singapore Health Ministry claims).
सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, सिंगापूरच्या चांगी विमानतळावर ओमायक्रॉन रुग्ण सापडला. ओमायक्रॉनची लागण झालेल्या व्यक्तीने सिंगापूरहून मलेशिया आणि ऑस्ट्रेलिया असा प्रवास केला.
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा पहिला बाधित आढळल्यानंतर प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजनांवर भर दिला जात आहे. आफ्रिकन देशातून आलेल्या डोंबिवलीतील एका व्यक्तीला तर, दुसरीकडे पुण्यातील ६० वर्षीय संशियत बाधितामध्ये ओमायक्रॉन नव्हे तर इतर व्हेरियंटची लागण झाल्याचे समोर आले आहे त्यामुळे घाबरून न जाता नियमावलीचे पालन करणे आवश्यक असल्याचा सूचना आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आल्या आहेत.