2025 मध्ये अमेरिका आणि चीनमध्ये महायुद्ध होणार! अमेरिकेच्या हवाई दलाच्या जनरलचं धक्कादायक वक्तव्य

अमेरिका आणि तैवान या दोन्ही देशांमध्ये 2024 मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या दरम्यान चीन तैवानवर लष्करी कारवाई करण्याच्या संधीचा फायदा घेऊ शकतो. असेही ते म्हणाले.

    चीन आणि अमेरिका ( America and China War) यांच्यात दोन वर्षांत महायुद्ध होण्याची शक्यता आहे. अमेरिकन हवाई दलाच्या सर्वोच्च जनरलच्या दाव्यानंतर जगाला धक्का बसला आहे. जनरल माईक मिनिहान (mike minihan) यांनी म्हटले आहे की, 2025 मध्ये अमेरिका आणि चीनमध्ये महायुद्ध होऊ शकते. यासाठी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मेमोही पाठवला असून चीनची हुकूमशाही ज्या प्रकारे वाढत आहे, त्यामुळे कधीही युद्ध भडकू शकते, असे म्हटले आहे. त्यांनी लष्करी अधिकाऱ्यांना युद्धाची तयारी सुरू करण्यास सांगितले आहे.

    माझी शंका चुकीची असल्यास उत्तम – माइक मिनिहान 

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, एअर मोबिलिटी कमांडचे प्रमुख जनरल माइक मिनिहान म्हणाले की, मला आशा आहे की मी जे विचार करत आहे ते चुकीचे सिद्ध व्हायला हवे. माझी भीती चुकीची ठरु दे, ती जगाच्या भल्यासाठी आहे.

    2024 च्या निवडणुकीत चीन फायदा घेऊ शकतो

    जनरलचे मत पेंटागॉनचे प्रतिनिधित्व करत नसले तरी, तैवानवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा चीनचा संभाव्य प्रयत्न नाकारता येत नाही. जनरल मिनिहान यांनी म्हण्टले की, अमेरिका आणि तैवान या दोन्ही देशांमध्ये 2024 मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या दरम्यान चीन तैवानवर लष्करी कारवाई करण्याच्या संधीचा फायदा घेऊ शकतो. यानंतर परिस्थिती अशी बनू शकते की 2025 मध्ये अमेरिका आणि चीनमध्ये युद्धाची शक्यता वाढू शकते.