चीन म्हणतोय कोरोनाची माहिती आम्ही लपवलीच नाही

जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या टीमने चीनच्या वुहानचा दौरा केला होता. मध्य चीनच्या वुहानमध्येच २०१९ च्या शेवटी कोरोनाचा पहिला रुग्ण समोर आला होता. यावर टीमचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

    जगभर कोरोना विषाणूसारख्या महामारीचा फैलाव करून नामानिराळ्या झालेल्या चीन खोटे बोलण्यात आणि अजब दावे करण्यात पटाईत आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. कोरोना विषाणूविषयी तर्कवितर्क लढवले जात असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये जात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडलेल्या वुहानमध्ये पाहणी केली. संघटनेने आपला अहवाल अद्याप सादर केला नाही. परंतु, चीनने त्याआधीच यावर प्रतिक्रिया दिली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी यांग ताओच्या म्हणण्यानुसार ‘आमचे उद्दीष्ट पारदर्शकता दर्शविणे आहे. चीनने कोरोनाविरुद्ध पारदर्शक पद्धतीने लढा दिला आहे आणि काहीही लपवले नाही.

    जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या टीमने चीनच्या वुहानचा दौरा केला होता. मध्य चीनच्या वुहानमध्येच २०१९ च्या शेवटी कोरोनाचा पहिला रुग्ण समोर आला होता. यावर टीमचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

    चीनमध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळल्याच्या घटनेला एक वर्ष होऊन गेले तरीही शास्त्रज्ञ या रोगाचे कारण शोधू शकलेले नाहीत. कोरोनामुळे जगभरात तब्बल 2.7 दशलक्ष लोकांचे बळी गेले आहेत. यावर अभ्यास केलेल्या काही शास्त्रज्ञांनी सांगितलं, की कोरोना पुढील काही वर्ष असाच राहिलं, कारण हा एक मोसमी आजार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, मागील आठवड्यात जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दहा टक्के वाढ झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण अमेरिका आणि यूरोपमध्ये आढळले आहेत.