‘हा’ आहे जगातला असली Tarzan, प्राण्यांमध्ये राहून काढलं संपूर्ण आयुष्य, स्त्रीच्या अस्तित्वाविषयी माहितीच नाही…कोण आहे ही व्यक्ती?

९१७२ मध्ये झालेल्या वियतनामच्या युद्धात वान लांघची आई, दोन भाऊ आणि बहिणींची अमेरिकेने केलेल्या हल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आपल्या वडिलांसोबत गाव सोडून क्वांग नगई प्रांतातील ताई ट्रा या जिल्ह्यातील घनदाट जंगलात त्यांनी निवास केला. चार दशकांमध्ये त्याने फक्त पाच व्यक्तींना पाहिले आणि प्रत्येक वेळी तो त्यांच्यापासून दूर पळत राहिला. वान आपल्या वडील आणि भावासोबत घनदाट जंगलात राहू लागला. तो पोटाची खळगी भागवण्यासाठी फळं, मध आणि जंगली प्राण्यांना खात असे.

  नवी दिल्ली :  तुम्ही टीव्हीवरती टार्झनला पाहिलचं असेल किंवा टार्झनची पुस्तके देखील वाचली असतील. परंतु तो या जगात खरोखरचं आहे का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. मात्र, आता आम्ही ज्या टार्झनविषयी आपल्याला सांगत आहोत, तो टार्झन वियतनाममध्ये वान लांघ या नावाने ओळखला जातो. या टार्झनचं वयवर्ष ४९ आहे. वान लांघ आपल्या भाऊ आणि वडिलांसोबत जंगलामध्ये राहतो. तो सामाजिक जीवनातून इतक्या दूर आहे की, त्याला हे सुद्धा माहिती नाहीये की जगात स्त्री सारखी व्यक्ती सुद्धा अस्तित्वात आहे. संपूर्ण जग वान लांघला असली टार्झन या नावाने ओळखत आहे.

  ४० व्या वयात त्याने फक्त पाच व्यक्तींना पाहिलं होतं

  ९१७२ मध्ये झालेल्या वियतनामच्या युद्धात वान लांघची आई, दोन भाऊ आणि बहिणींची अमेरिकेने केलेल्या हल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आपल्या वडिलांसोबत गाव सोडून क्वांग नगई प्रांतातील ताई ट्रा या जिल्ह्यातील घनदाट जंगलात त्यांनी निवास केला. चार दशकांमध्ये त्याने फक्त पाच व्यक्तींना पाहिले आणि प्रत्येक वेळी तो त्यांच्यापासून दूर पळत राहिला. वान आपल्या वडील आणि भावासोबत घनदाट जंगलात राहू लागला. तो पोटाची खळगी भागवण्यासाठी फळं, मध आणि जंगली प्राण्यांना खात असे.

  अल्वारो सेरेजो या फोटोग्राफरने त्यांच्या कुटुंबियांना रेस्क्यू केलं

  २०१५ मध्ये अल्वारो सेरेजो या फोटोग्राफरने त्यांच्या कुटुंबियांना आणि निवासस्थानाला ट्रॅक केलं. त्यांनी या तिघांनाही जंगलातून बाहेर काढलं आणि एका स्थानिक गावात घेऊन गेले. जिथे महिला सुद्धा राहत आहेत. जेव्हा पहिल्याच क्षणी अल्वारो यांनी या छोट्याश्या कुटुंबियांना जंगलात पाहिलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की, लांघ कुटुंंबियांना हे सुद्धा माहिती नव्हतं की जगात मनुष्य जातीसारखी एक प्रजाती आहे. त्यांनी फक्त आपल्या आजूबाजूला जंगली प्राणीचं पाहिले होते.

  वियतनाम युद्धामध्ये गाव सोडून पळालं होतं हे कुटुंब

  अल्वारो यांनी सांगितलं की, या युद्धामुळे वानच्या वडिलांची तब्येत प्रचंड प्रमाणात बिघडली आणि हे युद्ध संपल्यानंतर त्यांनी गाव सोेडून जंगलात राहण्याचा निर्णय घेतला. वानच्या वडिलांना युद्धाबाबत मोठ्या प्रमाणात भिती वाटतं होती. हे युद्द संपलं असून पण त्यांना या सर्व गोेष्टींवर विश्वास नाहीये. वानचे वडील जेव्हा इतर व्यक्तींना जंगलात पाहायचे, तेव्हा ते त्या लोकांपासून लपून राहायचे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आजही ते पुरुष आणि स्त्रियांमधील अंतर ओळखण्यास असमर्थ आहेत. मागील ८ वर्षांपासून ते या गावात राहत असून कसे जगायचे ते शिकण्याचा प्रयत्न करीत आहे.