One crore of those waiting for the rain of money disappear

लॉटरी व्हेंडिंग मशिन वापरताना चुकून बटण दाबले गेले आणि त्या महिलेचे नशीबच पालटले आहे. विश्वास बसणार नाही; पण त्या महिलेला चक्क 50 हजार डॉलर्सची (भारतीय चलनात 37 लाख 31 हजार 710 रुपये) लॉटरी लागली. नशीब बदलायला वेळ लागत नाही, असे म्हटले जाते. त्याचा या घटनेतून प्रत्यय आला(This is called good luck! Lottery worth Rs 37 lakh started by accidentally pressing the button ).

    माहितीनुसार, अमेरिकेत मेरीलँडमध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबत सुखद अशी ही घटना घडली आहे. ही महिला हॅगर्सटाउनमधल्या हाफवे लिकर्समध्ये लॉटरी व्हेंडिंग मशीनजवळ उभी होती. यादरम्यान चुकून महिलेच्या हातून लॉटरी मशीनचे बटण दाबले गेले. बटन दाबताच मशीनमधून $20 स्क्रॅच-ऑफ गेमऐवजी 5 डॉलरचे डिलक्स क्रॉसवर्ड म्हणजे 50 हजार डॉलर्स लॉटरीचं तिकीट बाहेर आले.

    तिकीट पाहिल्यानंतर आपल्याला 50 हजार डॉलर्सची लॉटरी लागली आहे, हे महिलेच्या लक्षातच आले नाही. हवे असलेले तिकीट न आल्याने महिला नाराज झाली. क्रॉसवर्ड गेम आवडत नसल्याने महिला ते तिकीट घेऊ घरी आली. घरी आल्यानंतर मेरीलँड लॉटरी स्मार्टफोन अॅपवरून तिने तिकीट स्कॅन केले. तिकीट स्कॅन करताच महिलेला अभिनंदनासह $50,000 डॉलर जिंकल्याचा मॅसेज आला. हे पाहताच तिला आश्‍चर्याचा धक्काच बसला. एवढी रक्कम एका झटक्यात मिळणार आहे, हे पाहून तिचा डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.

    हे सुद्धा वाचा