‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी पाण्याची बाटली ; एक थेंब पडताच वाया जातात हजारो रुपये

जगात अनेक प्रकारच्या महागड्या गोष्टी आहेत. हिरे-मोत्याशिवाय कधी-कधी अशा काही महागड्या वस्तू चर्चेत येतात कि ज्याची किंमत जाणून माणसाला आश्चर्य वाटते की ही वस्तू इतकी महाग कशी असू शकते?सोन्या-चांदीचे दागिने, जमीन आणि मालमत्ता मौल्यवान असेल तर ते समजण्यासारखे आहे.

    जगात अनेक प्रकारच्या महागड्या गोष्टी आहेत. हिरे-मोत्याशिवाय कधी-कधी अशा काही महागड्या वस्तू चर्चेत येतात कि ज्याची किंमत जाणून माणसाला आश्चर्य वाटते की ही वस्तू इतकी महाग कशी असू शकते?सोन्या-चांदीचे दागिने, जमीन आणि मालमत्ता मौल्यवान असेल तर ते समजण्यासारखे आहे. त्यांची किंमत कालांतराने वाढते. पण कधी तुम्हाला पाण्याच्या बाटलीसाठी लाखो खर्च करावे लागले तर?(Beverly Hills 9OH2O ) , (Water Bottle)

    पाण्याची बाटली विकत घेण्यासाठी तुम्ही आजपर्यंत दहा ते पंधरा रुपये खर्च केले असतील. विमानतळावर जाताना पाण्याच्या बाटलीसाठी शंभर ते दीडशे रुपये खर्च झाले असतील. पण पाण्याची एक बाटली घेण्यासाठी तुम्ही ६५ लाख रुपये खर्च करणार का? नाही, ना.. पण तुम्हाला हे माहित आहे का पाण्याची एक अनोखी आणि महागडी बाटली लॉन्च करण्यात आली आहे ज्याची किंमत लाखोंमध्ये आहे. याच्या एका बाटलीची किंमत 65 लाख आहे म्हणजेच या पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल आहे.

    Beverly Hills 9OH2O च्या एका बाटलीची किंमत ६५ लाख रुपये आहे. म्हणजेच एक थेंबही हजारोंमध्ये आहे. सामान्य माणूस ते विकत घेण्याचा विचारही करू शकत नाही. तुम्ही नक्कीच विचार करत असाल की या पाण्याच्या बाटलीमध्ये इतके विशेष काय आहे की ती इतकी मौल्यवान आहे. बेव्हरली नावाच्या कंपनीने लाँच केलेल्या या बाटलीमुळे ती इतकी मौल्यवान बनली आहे. या बाटलीची टोपण पांढऱ्या सोन्याने बनलेले आहे. यासोबतच त्यावर हिरेही जडवलेले आहेत.

    पाण्याचा व्यवसाय नवीन नाही

    एवढ्या किमतीत पाण्याची बाटली विकणारी बेव्हरली ही एकमेव कंपनी नाही. मात्र त्याच्या जास्त किमतीचे कारण म्हणजे त्याच्या बाटलीची रचना. क्रिकेटपटू विराट कोहलीही अशी महागडी पाण्याची बाटली पिण्यासाठी ओळखला जातो. बेव्हरलीच्या या 65 लाख रुपयांच्या फक्त 9 पाण्याच्या बाटल्या बनविण्यात आले आहेत. ज्यांच्या 14 कॅरेटच्या झाकणात अडीचशे हिरे जडवले जातील.