पाकिस्तानातील आर्थिक संकटानं हिरावली माणुसकी! रेशन मागण्यासाठी आलेल्या तृतीयपंथीयांना धान्य देण्याच्या बदल्यात करायला लावला डान्स

पाकिस्तानी न्यूज वेबसाइट जिओ टीव्ही उर्दूच्या बातमीनुसार व्हायरल होत असलेला व्हिडिओ गुजरांवाला येथील आहे. रेशन देण्याच्या बदल्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी तृतीयपंथीयांना नाचायला लावले.

    इस्लामाबाद : सध्या पाकिस्तानमध्ये (Pakistan Economic Crisis ) राशन मिळणं म्हणजे लोकांसाठी मोठे युद्ध जिंकल्यासारखे आहे. देशाच्या अनेक भागातून आटा-डाळ गायब झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लोक रेशनवरून भांडताना आणि वाहनांचा पाठलाग करताना दिसत आहेत. दरम्यान, पाकिस्तानमधून आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात एक तृतीयपंथीय नाचताना दिसतो. राशनच्या बदल्यात तीयपंथीयांना नाचायला लावल्याचा दावा केला जात आहे. यावरुन पाकिस्तानमधील लोकांचे खाण्यामुळए किती हाल होत आहेत ते दिसत आहे.

    पाकिस्तानी न्यूज वेबसाइट जिओ टीव्ही उर्दूच्या बातमीनुसार व्हायरल होत असलेला व्हिडिओ गुजरांवाला येथील आहे. रेशन देण्याच्या बदल्यात  सरकारी कर्मचाऱ्यांनी तृतीयपंथीयांना नाचायला लावले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर उपायुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रिपोर्टनुसार, तृतीयपंथीयांचा आरोप आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांनी तिला राशनच्या बदल्यात डान्स करायला सांगितले. दुसरीकडे सरकारी कार्यालयाच्या प्रभारींनी हा व्हिडिओ जुना असल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले.

    गरीबाने बनवले ‘चिकन चोर’ देशातील गरिबीच्या परिस्थितीमुळे गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी लोक आता कुठेही, मग ते लष्कराचे मुख्यालय असले तरी चोरी करायला तयार आहेत. लष्कराच्या मुख्यालयातून अलीकडेच काही चोरट्यांनी पोल्ट्री फार्म लुटला. सुमारे 12 जण शस्त्रांसह आले, त्यांनी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले आणि शेतातील सुमारे 5 हजार कोंबड्या लुटल्या. या कोंबड्यांची किंमत सुमारे 30 लाख रुपये होती.