
स्फोटाच्या वेळी खुरासानी कारमधून प्रवास करत होता. कारमधील सर्व ३ जण या स्फोटात ठार झाले. हा स्फोट कसा झाला हे समजू शकलेले नाही. खुरासानीवर अमेरिकेने ३ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ठेवले होते. मृतांमध्ये टीटीपीचे आणखी दोन कमांडर मुफ्ती हसन आणि हाफिज दौलत खान यांचा समावेश आहे.
नवी दिल्ली – पाकिस्तान तहरीक-ए-तालिबानचा (TTP) संस्थापक कमांडर उमर खालिद खुरासानी उर्फ अब्दुल वली मोहम्मद याचा रविवारी एका स्फोटात मृत्यू झाला. अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात तो उपस्थित होता. स्फोटाच्या वेळी खुरासानी कारमधून प्रवास करत होता. कारमधील सर्व ३ जण या स्फोटात ठार झाले. हा स्फोट कसा झाला हे समजू शकलेले नाही. खुरासानीवर अमेरिकेने ३ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ठेवले होते. मृतांमध्ये टीटीपीचे आणखी दोन कमांडर मुफ्ती हसन आणि हाफिज दौलत खान यांचा समावेश आहे.
अगदी लहान वयात जिहाद सुरू करणारा खुरासानी काश्मीरमध्येही सक्रिय होता. याआधीही त्याच्या मृत्यूच्या बातम्या अनेकदा आल्या होत्या, पण ते चुकीचे निघाले. यावेळी तहरीक-ए-तालिबानने खुरासानीच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. संघटनेचे प्रवक्ते मोहम्मद खुरासानी यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की TTP लवकरच त्याच्या मृत्यूबद्दल अधिक तपशील देईल.
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने अद्याप या घटनेबाबत कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. उमर खालिद खुरासानीवर कोणी हल्ला केला हे देखील स्पष्ट झालेले नाही.