papad for 511 rupees

मलेशियातील (Malaysia) एका रेस्टॉरंटमध्ये एक किस्सा घडलाय. या हॉटेलात पापडाची (Papad News) किंमत त्यांचं चलन असलेल्या रिंगिट्समध्ये 27 अशी दर्शवण्यात आली. त्या पापडाची भारतीय रुपयांत किंमत होते 511 रुपये. इतकंच नाही तर पापड हे नावही बदलून त्याऐवजी याचं नाव करण्यात आलंय एशियन नाचोज.

  नवी दिल्ली: पापड (Papad) हा जेवणातला महत्त्वाचा पदार्थ. खिचडी-कढी असो की आमटी-भात त्याच्यासोबत असलेल्या पापडामुळं जेवणाची लज्जतच वाढते. आपल्याकडे या पापडाची किंमत घरी तळला तर असते 2 रुपयांच्या आसपास. हॉटेलाता पापड खाल्ला तर त्याची किंमत असते 5 ते 10 रुपयांच्या घरात. हाच पापड जर कुठल्या रेस्टॉरंटमध्ये 511 (Papad For 511 Rupees)रुपयांना मिळत असेल तर. तुम्ही त्या हॉटेलात ग्राहक म्हणून गेला असता, तर तुम्हालाही याचा संताप आल्याशिवाय राहिला नसता. हाच प्रकार नेमका घडलाय. भारतातून मलेशियात गेलेल्या एका व्यक्तीनं हॉटेलात जेवणासोबत पापड मागवला. या मलेशियन रेस्टॉरंटनं (Malaysian Restaurant) त्याला पापड तर दिला, मात्र जेव्हा बिल आलं तेव्हा हा भारतीय ग्राहक उडालाच. बिलात पापडाची किंमत 511 रुपये लावण्यात आली होती. स्वाभाविकच त्यालाच काय पण उतर भारतीयांनाही या प्रकारामुळं संताप झाला.

  2 रुपयांचा पापड 511 रुपयांना कशासाठी ?
  हा किस्सा घडलाय मलेशियातील एका रेस्टॉरंटमध्ये. या हॉटेलात पापडाची किंमत त्यांचं चलन असलेल्या रिंगिट्समध्ये 27 अशी दर्शवण्यात आली. त्या पापडाची भारतीय रुपयांत किंमत होते 511 रुपये. इतकंच नाही तर पापड हे नावही बदलून त्याऐवजी याचं नाव करण्यात आलंय एशियन नाचोज. इंडियन डिशचं नाव बदलून त्यात शंभरपटींनी वाढ करण्याच्या या वृत्तीचाही भारतीयांना संताप आला नसता तरच नवल. त्यानंतर भारतीयांना या रेस्टॉरंटला मेनू कार्डच्या फोटोसह ट्रोल करण्यास जोरदार सुरुवात केली. फक्त 2 रुपयांचा पापड 511 रुपयांना का विकताय, आणि त्याचं नाव का बदललंय, अशी विचारणा युझर्स करु लागलेत.

  हा तर फूड क्राईम
  या मुद्द्यावर विश्वास बसणार नाही, पण हजारो ट्विट करण्यात आले आहेत. अनेक जणांनी याचा उल्लेख फूड क्राइम असा केलाय. तर काही युझर्सनी उद्या मुगाचे पापड ब्लॅक नाचोज म्हणून विकतील, अशी उपरोधिक टीकाही केलीय. तर काही जणांनी हे मोठं रॅकेट असल्याचं म्हटलंय. एकूण 200 हून अधिक टक्के नफा मिळवण्याचं हे रॅकेट असल्याचा उल्लेख करण्यात आलाय.

  हॉटेलांची दरांची का मनमानी?
  मोठमोठ्या हॉटेलांत स्वस्त वस्तूंची नाव बदलून त्यांचं नवं ब्रँडिंग करुन, त्या महागात विकण्याची प्रथाच आहे. ही प्रथा चुकीची असल्याचं अनेकांचं मत आहे. हा किस्सा डरी मलेशियातील असला तरी भारतातल्या अनेक हॉटेल्समध्येही ग्राहकांना असेच अनुभव गाठिशी आहेत. अगदी समोसा, चहासाठीही जास्त रक्कम उकळली जाते, असेही अनुभव आहेत. हॉटेलमधील वस्तूंच्या दरावर सरकारचे नियंत्रण नाही, हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे. सरकार यातून कर आकारणी तर करते, मात्र या वस्तूंचे दर काय असावेत, याच्या कोणत्याही मार्दर्शक सूचना आपल्याकडे अस्तित्वात नाहीत. याचाच फायदा मोठमोठ्या हॉटेल चालकांकडून घेतला जातो. हॉटेलातील मेन्यू कार्डबाबत अशा मार्गदर्शक सूचनांची गरज व्यक्त करण्यात येतेय.