sheikh khalifa zayed

युएईचे अध्यक्ष शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान (Sheikh Khalifa bin Zayed Al Nahyan) यांचा मृत्यू (Death) झाला आहे. ते ७३ वर्षांचे होते.

    युएई: संयुक्त अरब अमिराती (UAE) अर्थात युएईचे अध्यक्ष शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान (Sheikh Khalifa Bin Zayed Al Nahyan) यांचा मृत्यू (Death) झाला आहे. ते ७३ वर्षांचे होते. शेख खलिफांच्या निधनानंतर युएईमध्ये चार दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या काळात सर्व सरकारी कार्यालयावरचे ध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येणार असून सर्व कार्यालयं आणि खासगी कंपन्याही बंद ठेवण्यात येतील.

    शेख खलिफा बरीच वर्षे आजारी होते. त्यांच्या मृत्यूनंतर आता अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झाएद  यांच्याकडे कारभार सोपवला जाऊ शकतो. मात्र याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

    गेल्या काही वर्षांपासून शेख खलिफा फारसे कुठे जात नव्हते. शेख खलिफा यांचे वडील आणि यूएईचे संस्थापक शेख झाएद यांचा २००४ साली मृत्यू झाला होता. त्यानंतर युएईच्या अध्यक्षपदी शेख खलिफा यांची निवड झाली होती. काही वर्षांपूर्वी त्यांना स्ट्रोकचा गंभीर आजार जडला. जगातील सर्वात उंच टॉवर असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफाचे नाव हे शेख खलिफा यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे.