प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

युकेने(Uk Government Decision About Covishield Vaccine) आपला निर्णय बदलून नवीन प्रवास नियमावली जारी(Travel Advisory Of UK Government) केली आहे.

    नवी दिल्ली : ब्रिटनने अखेर भारतात तयार झालेल्या कोव्हिशिल्ड लसीला परवानगी दिली आहे. युकेने(Uk Government Decision About Covishield Vaccine) आपला निर्णय बदलून नवीन प्रवास नियमावली जारी(Travel Advisory Of UK Government) केली आहे.कोव्हिशिल्डला (Permission To Covishield In UK) याआधी परवानगी नाकारल्याने भारताने नाराजी व्यक्त केली होती. ब्रिटनने या गोष्टीची दखल घेतली आहे. आता ज्यांनी भारताच्या कोव्हिशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना ब्रिटनमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. मात्र ब्रिटनने कोव्हिशिल्ड लसीच्या प्रमाणपत्राला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे लस घेतल्याचा पुरावा काय दाखवायचा हे स्पष्ट झालेले नाही. तसेच परवानगी देऊनही प्रमाणपत्राला मंजुरी नसल्याने क्वारंटाईनचे जुने नियमच पाळावे लागणार असल्याची खंत व्यक्त होत आहे.

    भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले होते की, कोव्हिशिल्ड लसीला परवानगी न करणे हे भेदभाव करणारे धोरण आहे. यानंतर ब्रिटनने ते लवकरच सोडवण्याचे आश्वासन दिले होते. अखेर ब्रिटनने भारताच्या कोव्हिशिल्ड लसीला परवानगी दिली.


    ब्रिटनमध्ये कोरोना नियम बदलून कोव्हीशिल्डचे दोन्ही डोस असूनही ब्रिटनमध्ये येणाऱ्यांना १० दिवसांचे क्वारंटाईन अनिवार्य केले होते. अशा परिस्थितीत भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी कोव्हीशिल्ड लसीबाबत ब्रिटीश सरकार भेदभाव करत असल्याचं म्हटलं होतं. पण ब्रिटनने भारताच्या लसीचे प्रमाणपत्र मंजूर केलेले नाही. यामुळे भारतीय प्रवाशांमध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल होणार नाही.