रशियाच्या दोन हवाई तळावर युक्रेनचा ड्रोन हल्ला; तीन सैनिक ठार, अनेक जखमी

युक्रेनकडून आणखी हल्ल्याचा धोका लक्षात घेता, रशियन एअरबेसला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

    युक्रेन : सोमवारी युक्रेनच्या ड्रोन विमानांनी रशियाच्या सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या दोन हवाई तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात पुतिन यांचे तीन सैनिक ठार झाले तर चार जखमी झाले. या ड्रोन हल्ल्यात दोन रशियन Tu-95 अणुबॉम्बरही नष्ट झाल्याचं सांगण्यात येत आहे. युक्रेन आणि ब्रिटनला घाबरवण्यासाठी रशियाने हे बॉम्बर तैनात केले होते.  युक्रेनकडून आणखी हल्ल्याचा धोका लक्षात घेता, रशियन एअरबेसला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. याआधी, सेराटोव्हमधील एंगेल्स एअरबेस आणि रियाझानमधील डायघिलेव्ह एअरबेसवर मोठे स्फोट झाल्याची नोंद झाली होती, परंतु अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.

    युक्रेनच्या हवाई दलाने या हल्ल्यांबाबत नाव न घेता ट्विट केलं

    रशियन सैन्याने युक्रेन हल्ल्यावर अधिकृतपणे भाष्य केले नसले तरी त्यांच्या हवाई दलाने ट्विट केले “काय झाले?” पार्टी करणाऱ्या चेहऱ्याच्या इमोजीसह आणि खराब झालेल्या विमानासारखे दिसणारे फोटो शेअर केले आहेत.

    हल्ल्यानंतर पुतिन स्वत:हून क्राइमिया ब्रिजवर केली पाहणी

    मॉस्कोने युक्रेनवर यापूर्वीही अनेकवेळा आपल्या भूभागावर आक्रमण केल्याचा आरोप युक्रेननं केला आहे, परंतु हे कथित हल्ले रशियातील मागील हल्ल्यांपेक्षा अधिक तीव्र आहेत. क्रेमलिन येथील हल्ल्यानंतर पुतिन क्राइमिया ब्रिज दौऱ्यावर पोहोचले आहेत. पुतिन यांनी स्वतः क्रिमिया ब्रिजवरून गाडी चालवली आणी पाहण केली.