putin and zelensky

युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी करण्यास तयार असल्याचे संकेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिले आहेत. युद्ध संपवण्यासाठी त्यांनी युक्रेनच्या सैन्याला सीमेवर नियंत्रण मिळण्याची अट ठेवली आहे.

  युक्रेन: रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्ध गेल्या 16 महिन्यांहून अधिक काळ सुरु आहे. (Russia Ukraine War) दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले केले जातायत. या युद्धामध्ये युक्रेन आणि रशियामधील हजारो नागरिक आणि सैनिकांचा मृत्यू झालाय. मात्र, युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नव्हती. या युद्धाबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की (Vladimir Zelensky) यांनी आता युद्ध संपवण्याचे संकेत दिले आहेत. पण, त्यासाठी त्यांनी काही अटी ठेवल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे.

  नक्की काय घडलं?
  युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी स्पेनचे पंतप्रधान (Prime Minister of Spain) पेड्रो सांचेज (Pedro Sánchez) यांच्यासोबतच्या संयुक्त संवाद संमेलनामध्ये रशिया-युक्रेन युद्धाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. झेलेन्स्की यांनी रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष संपवण्यावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं आहे. रशियन न्यूज एजन्सी TASS ने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की संघर्ष संपवण्यावर वक्तव्य केलं आहे. युक्रेनच्या सैन्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेल्या देशाच्या सीमेवर नियंत्रण मिळवून दिल्यास युद्ध संपवण्याची अट झेलेन्स्की यांनी ठेवली आहे. शनिवारी एका पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयी माहिती दिली आहे.

  युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी करण्यास तयार असल्याचे संकेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिले आहेत. युद्ध संपवण्यासाठी त्यांनी युक्रेनच्या सैन्याला सीमेवर नियंत्रण मिळण्याची अट ठेवली आहे. या सीमांमध्ये क्रिमिया, डॉनबास, झापोरोझ्ये आणि खेरसन प्रदेशांचा समावेश आहे. शनिवारी स्पॅनिश पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत, झेलेन्स्की यांनी सीमा नियंत्रणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. झेलेन्स्की यांनी सांगितलं की, युद्ध संपवण्याच्या वाटाघाटी करण्यास तयार आहेत. पण, त्यासाठी रशियाच्या आक्रमणाआधी युक्रेनच्या ताबा असलेल्या सीमेवर युक्रेनला पुन्हा नियंत्रण मिळायला हवं.

  स्पेनच्या पंतप्रधानांचा युक्रेन दौरा
  स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ हे सध्या युक्रेन दौऱ्यावर आहेत. सांचेझ यांच्या कीव्ह भेटीच्या निमित्ताने झेलेन्स्की यांनी स्पॅनिश माध्यमांना संबोधित केलं. सांचेझ यांची युक्रेनची ही तिसरी भेट आहे. स्पेननं नुकतेच युरोपियन युनियनच्या (European Union) परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारलं आहे. युक्रेन अनेक दिवसांपासून युरोपीय संघाचा (EU) सदस्य होण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामुळे युक्रेनला नाटोमध्ये (NATO) सामील होण्याचा मार्गही खुला होऊ शकतो.